Thane Crime: ठाण्यात 21 वर्षीय एअर होस्टेसने उचलले टोकाचे पाऊल, एक्स बॉयफ्रेंड प्राव्हेट…
दरम्यान, शुभांगीने एका युवकासोबत संसार थाटला. तिला एक बाळ आहे. शेखरचे मुलीकडे अजिबात लक्ष नव्हते. मुलगी धनश्रीची सासरी होणारी परवड बघता शुभांगीला वाईट वाटत होते. त्यामुळे तिचाही सांभाळ करण्याचे तिने ठरविले. शुभांगी शेखरकडे वारंवार मुलीचा ताबा मागत होती. परंतु, शेखरचा त्याला तीव विरोध होता.
मागितले पाणी, मिळाला मृत्यू
बुधवारी पहाटे ५.३० वाजता धनश्रीची झोप उघडली. तिने वडीलाला उठवत पिण्यासाठी पाणी मागितले. शुभांगीमुळे आधीच रागात असलेल्या शेखरने चाकू आणून धनश्रीच्या छातीत भोसकला. धनश्रीचा ओरडण्याचा आवाज ऐकून आजी आणि काकाची झोप उघडली. ते धनश्रीला बघण्यासाठी धावले असता ती रक्ताच्या थारोळ्यात पडून होती दोघांनीही तत्काळ धनश्रीला वाठोडा पोलिस स्टेशन गाठत घटनेची माहिती दिली. पोलिसांनी धनश्रीला उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात नेले असता डॉक्टरानी मृत घोषित केले. पोलिसानी धनश्रीची आजी कुसूमा शेंदरे (७१) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत शेखरला अटक केली.
मारून टाकेन, पण देणार नाही
पत्नी शुभांगी वारंवार मुलीचा ताबा मागत होती. मात्र, दुसऱ्याशी घरठाव केल्यामुळे शेखर चिडून होता. ‘मी मुलीला मारुन टाकेन, पण ताबा तुला देणार नाही’ अशी धमकी शेखरने शुभांगीला दिली होती. त्याने शब्द खरे करून दाखवले. शेखरला न्यायालयात हजर करून तीन दिवसांची कोठडी घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक हरीश बोराडे यांनी दिली.
Ans: नागपूरमधील वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत, सरोदेनगर परिसरात.
Ans: पत्नी वारंवार मुलीचा ताबा मागत असल्यामुळे आरोपी संतप्त होता.
Ans: आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले, 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळवली.






