फोटो- (istockphoto)
पुणे: महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी तीन लाख ८० हजारांचे दागिने चोरून नेल्याची घटना कात्रज भगात घडली. याबाबत दिनकर सावंत (वय ५६, रा. कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंत यांची पत्नी रविवारी (१७ नोव्हेंबर) सकाळी अकराच्या सुमारास कात्रज भागातील अंबिका हाॅटेलसमोर थांबल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या पिशवीतून चोरट्यांनी तीन लाख ९० हजारांचे दागिने चोरून नेले.
काही वेळानंतर त्यांनी पिशवीची पाहणी केली. तेव्हा दागिने चोरून नेण्यात आल्याचे उघडकीस आले. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. शहरात पादचारी महिलांकडील मोबाइल संच, तसेच दागिने चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. स्वारगेट भागातील जेधे चौकात एका तरुणीच्या गळ्यातून मंगळसूत्र चोरून नेण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती.
कात्रजमधील ‘त्या’ हुक्का पार्लरबाबतचे स्मरणपत्र व्हायरल
पुणे शहरातील अवैध धंद्याबाबत तंबी देऊन अन् ६५ जणांची उचलबांगडी केल्यानंतर देखील त्यांची जागा आता नव्या वसूलीदारांनी घेतली आहे. परिणामी अवैध धंदे पुन्हा सुरू झाल्याचे दिसत असून, कात्रजमधील एका हुक्का पार्लरबाबतचा स्मरणपत्राचा एक मॅसेज सध्या पोलीस दलात प्रचंड व्हायरल होत आहे. स्मरणपत्राच्या मॅसेजमध्ये ६ वेळा हुक्का पार्लरबाबत तक्रार करूनही तो सुरूच आहे, असा आरोप केला जात आहे.
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्याभरापुर्वीच येथे कारवाई केली होती. तरीही तो हुक्का पार्लर सुरू असल्याचे सांगितले जाते. तत्पुर्वी नुकताच कात्रजमधील तीन पत्ती जुगारावर छापा मारून भारती विद्यापीठ पोलिसांनी १७ जणांवर गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे शहरातील अवैध धंदे छुप्या पद्धतीने सुरूच असल्याचे दिसते.
हेही वाचा: कात्रजमधील ‘त्या’ हुक्का पार्लरबाबतचे स्मरणपत्र व्हायरल; पोलीस दलात चर्चांना उधाण
तक्रारदार या गणेशमळा परिसरात राहायला आहेत. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील नवशा मारुती मंदिर परिसरातून त्या जात होत्या. त्यावेळी दोन चोरटे त्यांच्याजवळ आले. महिलांना मोफत साडी आणि पैशांचे वाटप करण्यात येत असल्याची बतावणी केली. तुमच्याकडील दागिने आणि रोकड काढून पिशवीत ठेवा, असे सांगितले. नंतर चोरट्यांनी महिलेला बोलण्यात गुंतवत त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून पिशवीतील दागिने आणि रोकड असा ५५ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.
पीएमपीमधून उतरताना मंगळसूत्र हिसकावले
स्वारगेटमधील जेधे चौकात पीएमपी बसमधून उतरताना गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात २६ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. तक्रारदार या हडपसरवरून पीएमपी बसने स्वारगेट परिसरात आल्या होत्या. जेधे चौकात बस थांबल्यानंतर त्या उतरल्या. तेव्हा बसमधून उतरताना मोठी गर्दी होती. या गर्दीत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला.