रायपूर मधून एक हत्येची धक्कदायक घटना समोर आली आहे. प्रेयसीनेच प्रियकराची हत्या केल्याचे समोर आले आहे. लॉजवर प्रियकर झोपेत असताना प्रेयसीने त्याच्यावर चाकूने वार करत हत्या केली. मृतकाचे नाव मोहम्मद सद्दाम असं आहे. तो बिहारच्या किशनगंजचा राहणार आहे. तर आरोपी तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. ती बिलासपूर येथील रहिवासी असून ती अल्पवयीन आहे. ही घटना रविवारी रात्री छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये घडली आहे.
तरूणाला घरी बोलावलं अन् नंतर गळा चिरून हत्या केली; झारखंडमधील धक्कादायक प्रकार समोर
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन युवती आणि मृत युवकामध्ये दीर्घकाळापासून प्रेमसंबंध होते. दोघे अनेकदा रायपुरला भेटायचे. त्यानंतर दोघे कुठल्यातरी हॉटेल किंवा लॉजवर उतरायचे. युवक अभनपुरला रहायचा. एमएस इंजीनियरिंग वर्कशॉपमध्ये नोकरी करायचा. शनिवारी दोघांनी भेटण्याची योजना बनवली. युवती बिलासपुर ट्रेनने रायपुरला आली. दोघे स्टेशनजवळच्या एका लॉजमध्ये गेले. तिथे खोली घेतली. रात्री युवतीने युवकाला सांगितलं की, ती गर्भवती आहे. युवक त्यावर म्हणाला की, आता त्याचं शिक्षण सुरु आहे. शिक्षण पूर्ण होईपर्यंत तो लग्न करु शकत नाही. युवकाने तिच्यावर गर्भपातासाठी दबाव टाकत होता.
गर्भपातासाठी म्हणत असल्याने…
त्यानंतर रविवारी सकाळी दोघांनी लॉजमधून चेकआऊट केलं. संध्याकाळी परत त्याच लॉजवर आले. रुम घेतली. मुलगा गर्भपातासाठी सांगत असल्याने मुलगी नाराज होती. रात्री उशिरा युवती उठली. चाकू उचलला व युवकावर चार-पाच वार केले. युवकाचा जागीच मृ्त्यू झाला. हत्या केल्यानंतर युवतीने लॉजची रुम बंद करुन बाहेर पडली. सकाळी 5.30-6 दरम्यान ट्रेनने पुन्हा बिलासपुरला परत आली. खोलीची चावी तिने रेल्वे ट्रॅकवर फेकून दिली.
आईची नजर कपड्यांवर गेली आणि…
घरी पोहोचल्यावर आईची नजर तिच्या कपड्यांवरील रक्ताच्या डागांवर गेली. आईने वारंवार विचारल्यानंतर युवतीने हत्येची कबुली दिली. मुलीकडून हे ऐकल्यानंतर आई घाबरली. तिने बिलासपूरच्या कोनी पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. कोनी पोलिसांनी गंज पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. गंज पोलीस लॉजवर गेले. डुप्लीकेट चावीने रुमचा दरवाजा उघडला. लॉजच्या खोलीत युवकाचा मृतदेह पडलेला होता. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून दिला आहे. अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतलं आहे. तिचा मोबाइलही जप्त केलाय. पोलीस तपास करत असून पुढील कारवाई केली जात आहे.
Bank Scam: फेरफार करून कृत्रिमरित्या वाढवल्या शेअर्सच्या किमती; खाजगी बँकेत २००० कोटींचा घोटाळा उघड