काय नेमकं घडलं?
आरोपीचे नाव सिकंदर गुप्ता (वय वर्ष 30) असे आरोपीचे नाव आहे. आरोप हा मुंबईत मजूर म्हणून काम करत होता. तो एका महिन्यापूर्वीच गावी परतला होता. सिकंदरची पत्नी प्रियंका (वय वर्ष 28) आणि आई रूना देवी (वय वर्ष 60) हे घराच्या छतावर होते. सकाळच्या सुमारास आरोपीनं दोघांवर प्राणघातक हल्ला केला. वीट उचलून दोघांची डोकी फोडली. या हल्ल्यामुळे त्या दोघांचाही जागीच जीव गेला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, सिकंदरने कवटीचे मांस खाण्यास सुरूवात केली. तसेच मांसाचे तुकडे फेकण्यास सुरूवात केली.
हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. या भयंकर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीवर दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केले. दोन तासांनंतर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. पोलीस आरोपीची मानसिक स्थिती देखील तपासात आहेत.
दारू आणि गांजाचे व्यसन
सिकंदरचे लग्न चार वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात झाले. मात्र, सिकंदर दररोज दारू पित होता. या व्यसनामुळे दोघांमध्ये प्रचंड भांडणे व्हायची. याच भांडणातून आरोपीनं क्रूर पद्धतीनं आई आणि पत्नीला संपवलं असल्याची माहिती आहे. गावकऱ्यांचा आरोप आहे की, सिकंदरला दारू आणि गांजाचे व्यसन होते. तो वारंवार पत्नी आणि आईला मारहाण करायचा. तसेच दोघांना जीवे मारण्याची धमकी देखील देत होता.
अटकेनंतर संवाद साधण्यास तयार नव्हता
लखनऊ येथील वरिष्ठ क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ पीके खत्री म्हणतात, कुशीनगरमधील आरोपी मनोविकाराने ग्रस्त असल्याचे दिसून येत आहे. ही एक गंभीर मानसिक आरोग्य स्थिती आहे. आरोपीला जेव्हा ताब्यात घेण्यात आले, तेव्हा तो खूप अस्वस्थ होत. तसेच संवाद साधण्यास तयार नव्हता. त्याची मानसिक स्थिती पूर्णपणे बिघडली असल्याचं दिसून येत आहे”. सध्या या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Accident News: पुणे-सोलापूर हायवेवर ड्रायव्हरचा ताबा सुटला अन् थेट…; 5 मृतदेह गाडीतच अडकले
Ans: उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील परसा गावात.
Ans: सिकंदर गुप्ता (वय 30), मुंबईत मजूर म्हणून काम करणारा.
Ans: दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीची मानसिक तपासणी सुरू आहे.






