वसई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळकरी मुले शाळेतून सुट्टी झाल्यावर घरी जात असतांना चाकूचा धाक दाखवत ३ तृतीयपंथांनी मुलांचा अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा डाव गावकऱ्यांनी उधळून लावला आहे. हे तिघे तृतीयपंथी नसून पुरुष होते. यांच्या सोबत १ रिक्षा चालक देखील होता. गावकऱ्यांनी या चौघांना बेदम मारहाण केली आहे.
नेमकं काय प्रकरण?
तृतीयपंथीयांचा वेश घेवून तीन पुरुष गावात आले होते. त्यांच्यासोबत एक रिक्षा चालक देखील होता. गावातल्या मुख्य रस्त्या लगत चालत शाळेतून मुलं घरी येत होते. त्यावेळी त्यांना चाकूचा धाक दाखवण्यात आला. शिवाय रस्त्यात अडवून पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळी मुलांनी आरडाओरडा केला. त्यामुळे गावकरी सावध झाले. त्यांनी त्या मुलांच्या दिशेने धाव घेतली. या मुलांची त्यांच्या तावडीतून सुटका केली. सुटका करण्यात आलेल्यांमध्ये तीन मुली आणि एका मुलाचे समावेश होते. ही घटना वसई पश्चिमेच्या खोचिवडे गावातील कुरणवाडी इथे घडली आहे.
सुटका केल्यानंतर संतप्त जमावाने या चारही आरोपींना बेदम मारहाण केली. त्यानंतर वसई पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसही त्या ठिकाणी पोहोचले. या सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Kalyan crime: मराठी तरुणीला मारहाण करणारा परप्रांतीय सापडला
डोंबिवली येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. डोंबिवलीच्या पिसोली गावात एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणिलाल एका परप्रांतीय गुंडाने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. जखमी झालेल्या तरुणीचा नाव सोनाली कळासरे असे आहे. मारहाण करणाऱ्या परप्रांतीयच नाव गोकुळ झा असे आहे. मारहाण केल्यानंतर हा फरार झाला. या मारहाणीचा व्हिडीओ वायरल झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याव्यक्तीचा छडा लावण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु केले होते. कल्याण पोलिसांची पाच पथकं त्याचा शोध घेत होते. तो अखेर मनसे कार्यकर्त्यांच्या हाती लागला आहे. नवाळी परिसरात त्याला ताब्यात घेण्यात आले.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी कसे पकडले?
मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी डोंबिवलीतील आपल्या कार्यकर्त्यांना गोकुळ झा याला शोधून काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मनसेचे कार्यकर्ते दिवसभर त्याला शोधत होते. अखेरीस रात्री तो कल्याणमधील वसार गावातून शेतातून पळत जात असताना मनसैनिकांना दिसला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडून गाडीत टाकले आणि पोलीस स्टेशनमध्ये नेले. पोलिस आज गोकुळ झा याला न्यायालयात सादर करणार आहे.
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; प्रियकराचं खरं रूप पुढे येताच केली आत्महत्या