खेळ बनला काळ! क्रिकेट सामन्यात केवळ 1 धावेवरून वाद (Photo Credit- Ai)
मिळालेल्या माहितीनुसार, विशाखापट्टणम येथील एका खाजगी मैदानावर दोन स्थानिक संघांमध्ये क्रिकेट सामना सुरू होता. सामन्याच्या रंगात एका धावेवरून खेळाडूंमध्ये बाचाबाची सुरू झाली. वादाचे स्वरूप वाढत असल्याचे पाहून अंपायर चिरंजीवी यांनी मध्यस्थी केली आणि खेळाडूंना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी हा वाद मिटल्यासारखा वाटला, तरी आरोपीच्या मनात मात्र रागाची ठिणगी कायम होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, के. किशोर (वय 26, व्यवसाय-फोटोग्राफर) हा आरोपी अंपायर चिरंजीवी यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे प्रचंड संतापला होता. सामना संपल्यानंतर सायंकाळच्या सुमारास दोन्ही गट पुन्हा आमनेसामने आले. तिथे जुन्या वादावरून पुन्हा वादावादी झाली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या संघर्षात आरोपी किशोरने अंपायर चिरंजीवी यांचा भाऊ अजित (वय 23) याच्यावर हल्ला केला.
पिंपरी-चिंचवडमध्ये टिप्परचा कहर, एकाच दिवशी तीन अपघात; एकाचा मृत्यू
वाद विकोपाला गेल्यानंतर किशोरने धारदार चाकूने अजितच्या छातीवर वार केले. गंभीर जखमी झालेल्या अजितला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
आंध्र प्रदेशच्या राजधानीबाबतचा अनेक वर्षांपासूनचा पेच आता अखेर सुटला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आंध्र प्रदेश पुनर्गठन (संशोधन) विधेयक, 2026 ला आपली अधिकृत मंजुरी दिली आहे. राष्ट्रपतींच्या या स्वाक्षरीनंतर आता अमरावती ही कायदेशीर आणि अधिकृतपणे आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून घोषित झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राजधानीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकीय आणि न्यायालयीन लढाईला आता पूर्णविराम मिळाला आहे. या निर्णयामुळे आंध्र प्रदेशच्या प्रशासकीय कामाला गती मिळणार असून, अमरावती शहराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
Pune Crime: संशयातून थरकाप! पत्नीची हत्या करून ‘अपघात’ दाखवण्याचा पतीचा डाव फसला; आरोपी अटकेत






