जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक ३५ वर्षीय महिला आपल्या लहान मुलासह रात्रीच्या सुमारास जात होती. त्यावेळी तिला घरी सोसाट असे म्हणत दुचाकीवरून जंगलात नेले. तेथे तिघांनी मिळून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. ही घटना भुसावळ तालुक्यातील ग्रामखेडी रोडवर घडली आहे. पीडित महिला हा सर्व प्रकार घडल्यानंतर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. आरोपींची नावे दशरथ गोरेलाल भिलाले, कुंदन गोरेलाल भिलाने आणि शंकर भगवानसिंग भिलाले (तीघेही रा. भुसावळ) असे आहे. दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून एक आरोपी फरार आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
पीडित महिला ही ३५ वर्षाची आहे. ती आपल्या लहान मुलासह ग्रामखेडी रोडने जात असताना तिला आरोपींनी घरी सोडतो असे म्हंटले. तिघांनी महिलेला दुचाकीवर बसवले आणि घरी नेण्या ऐवजी निर्जन जंगलात नेले आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित महिलेने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांची तत्काळ कारवाई पोलिसांनी दोन आरोपीला अटक केली. एक आरोपी फारर असून त्याचा शोध पोलीस घेत आहे. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख करत असून, लवकरच फरार आरोपीलाही अटक करण्यात येईल,असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. दशरथ गोरेलाल भिलाले, कुंदन गोरेलाल भिलाले आणि शंकर भगवानसिंग भिलाले (सर्व रा. भुसावळ) असे आरोपींचे नावे आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
संतापजनक! अल्पवयीन मुलीवर डॉक्टरांनी केलं अश्लील कृत्य; पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी फरार
भांडारा जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. आरोग्य तपासणीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीशी डॉक्टरने अश्लील कृत्य केल्याची घटना घडली आहे. आरोपी डॉक्टरच नाव देवेश अग्रवाल असे आहे. ही घटना साकोली येथे ९ जुलैला घडली होती. पीडितेच्या ताकारीवरून त्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहे.
नेमकं काय घडलं?
९ जुलैला पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या आईसोबत आरोग्य तपासणीसाठी गेली होती. त्यावेळी सोनोग्राफी करण्याच्या बहाण्याने मुलीशी डॉक्टरने सोनोग्राफी कक्षात अश्लील कृत्य केले. पीडितेने साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी श्याम हॉस्पिटलचे डॉक्टर देवेश अग्रवालच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.