सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. प्रेम प्रकरणातून एका २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन स्वतःचा आयुष्य संपवलं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक पत्र लिहून ठेवलं आहे. या पत्रात त्याने लिहिले आहे की तू मला फसवलं… तुझ्यामुळे मी फसलो असं लिहत त्याने टोकाचं पाऊल उचललं. गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव उज्ज्वल अरुण साबळे (रा. कोर्ट कॉलनी, कंबर तलाव, सोलापूर विजयपूर रोड, सोलापूर) असे आहे. या घटनेने त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
किती ती क्रूरता ! पहिले अपहरण मग लैंगिक अत्याचार आणि पुढे…. डोंबिवलीतील चीड येणारी घटना उघडकीस
प्रेम संबंधातून नैराश्य
उज्वलचे एका तरुणी सोबत प्रेमसंबंध होते. प्रेम संबंधातून उज्ज्वलला नैराश्य आले होते. अनेक दिवसापासून उज्ज्वल साबळे हा चीड चीड करत होता.उज्ज्वल हा खासगी ठिकाणी कामाला जात होता तर आई कोर्टात बेलिफ म्हणून कार्यरत आहे. कार्यक्रम असल्याने आई नातेवाईकांकडे मुंबईला गेली होती.
उज्ज्वल हा मागील काही दिवसांपासून तणावात होता, अशी माहिती आहे. त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. उज्वल ने राहत्या घरात सिलिंगच्या हुकला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री उघडकीस आली.
आत्महत्यापूर्वी लिहिले पत्र
त्याने गळफास घेण्यापूर्वी एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रामध्ये ‘तू मला फसवलं….तुझ्यामुळे मी फसलो’ असे लिहिले आहे. यातूनच त्याने आपल्या आयुष्याची अखेर केली. याबाबत त्याने एका डायरीत नोंद केली आहे.
भाऊ कामावरून आल्यावर बसला धक्का
नैराश्यात आणि तणावात असलेला उज्ज्वल हा अनेक दिवसांपासून एकटा आणि शांत राहत होता. शनिवारी रात्री ९वजनाच्या सुमारास राहत्या घरात कोणीच नसतांना त्याने गळफास घेत आत्महत्या केली. शनिवारी जेव्हा उज्ज्वलचा भाऊ कामावरून घरी आला, त्यावेळी त्याच्या पायाखालची जमीन खाली सरकली. घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत उज्ज्वलला पाहून त्याला धक्काच बसला. त्याने एकाच टाहो फोडला. त्याचा आवाज ऐकून शेजारचे जमले, त्यानंतर शेजारच्या मदतीने उज्ज्वलला खाली उतरवून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत उशीर झालेला, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. या घटनेने उज्वलच्या कुटुंबाला धक्काच बसला आहे.
10 कोटींचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा