File Photo : nitish kumar
पाटणा : गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. त्यात बिहारच्या राजकारणात आणखी एक पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये समाविष्ट होणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्याबाबत या पक्षाला खुली ऑफरच देण्यात आली आहे. लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला एनडीएमध्ये सामील होण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
हेदेखील वाचा : मोठी बातमी ! एकनाथ शिंदेंना आज द्यावा लागणार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा? कारणही आलं समोर…
भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष आणि नितीश कुमार यांच्या एनडीए सरकारमधील महसूलमंत्री दिलीप जयस्वाल यांनी राजद नेते तेजस्वी यादव यांना एनडीएमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. पाटणा येथे विधानसभेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी जयस्वाल यांनी भाष्य केले. ‘तेजस्वी यादव यांनी यावे, एनडीएमध्ये सामील व्हावे, ‘एक हो जाएंगे तो, सेफ हो जाएंगे’, असे त्यांनी म्हटल्याची माहिती दिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीत आपल्या प्रचारसभांमध्ये ‘एक हैं, तो सेफ हैं’ असा नारा दिला होता. त्याचवेळी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ निवडणूक सभांमध्ये ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा देत आहेत.
जयस्वाल यांना केंद्रीयमंत्री राजीव सिंह लालन रंजन यांच्या विधानावर प्रश्न विचारण्यात आला होता. लालन सिंह म्हणाले की, ‘नितीश सरकार मुस्लिमांच्या हितासाठी अनेक गोष्टी करत असूनही मुस्लिम जदयूला मत देत नाहीत तर त्यांना मत देतात. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अल्पसंख्यांकांसाठी खूप काम केले आहे, पण अल्पसंख्याक जदयूला मतही देत नाहीत. अल्पसंख्याक समाजाचाही नितीशकुमार यांच्यावर विश्वास असायला हवा, असे ते म्हणाले.
तेजस्वी यादव सत्ताधारी पक्षात गेल्यास…
तेजस्वी यादव सत्ताधारी पक्षात गेल्यास त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप धुतले जातील का, असे विचारले असता दिलीप जयस्वाल यांनी बिहारमध्ये एकत्रित सरकार आल्यास भ्रष्टाचाराशी संबंधित खाते तेजस्वी यादव यांना देऊ, असे उत्तर दिले आणि मग तेजस्वीला शेवटी भ्रष्टाचाराचा सामना कसा करायचा हे समजेल.
हेदेखील वाचा : RBI Governor Shaktikanta Das news: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास रुग्णालयात दाखल
दरम्यान, एकीकडे केंद्रीय मंत्री आणि जेडीयूचे दिग्गज नेते लालन सिंह यांच्या वक्तव्यावरून बिहारमध्ये राजकारण तापले आहे. दुसरीकडे, बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी तेजस्वी यादव यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. तेजस्वी यादव यांना सुरक्षित राहायचे असेल तर त्यांनी एनडीएशी हातमिळवणी करावी. जर ते एनडीएसोबत आले तर ते सुरक्षित असतील, असे त्यांनी म्हटले आहे.