( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
माध्यमांशी संवाद साधताना आकांक्षा म्हणाली की, कोणतीही समजूतदार स्त्री केवळ टीआरपी किंवा प्रसिद्धीसाठी राष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलणार नाही. ट्रोलर्सना प्रत्युत्तर देताना तिने सांगितले की, अशा प्रकारचे आरोप करणाऱ्यांनी तिच्या कायदेशीर टीमशी संपर्क साधावा. ती आणि गौरव अद्यापही घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत असल्याचेही तिने स्पष्ट केले.
आकांक्षाने सांगितले की, शोमध्ये सहभागी होण्यापूर्वीच दोन्ही बाजूंच्या कायदेशीर टीम परस्पर संमतीने घटस्फोटाच्या कागदपत्रांवर काम करत होत्या. अंतिम स्वाक्षऱ्या बाकी होत्या. त्यामुळे हा निर्णय शोसाठी घेतल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचे तिने स्पष्ट केले.
‘लॉक अप २’मध्ये आकांक्षाने सांगितले होते की, तिच्या आणि गौरवमध्ये कोणताही कटुता किंवा वैर नाही. ते आजही एकमेकांशी संवाद साधतात. मात्र, भविष्याबाबत दोघांचे विचार वेगळे होते. गौरवला कुटुंब वाढवून वडील व्हायचे होते, तर आकांक्षाला मूल नको होते. या मूलभूत मतभेदांमुळे त्यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
आकांक्षाने शेवटी स्पष्ट केले की, दोघेही अभिनेते असल्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रत्येक निर्णय हा प्रसिद्धीसाठी घेतला जातो, असा समज चुकीचा आहे. त्यांच्या नात्याचा शेवट हा केवळ वैयक्तिक आयुष्यातील निर्णय होता, टीआरपी किंवा पब्लिसिटी स्टंट नव्हता.






