Jiya Shankar Engagement: 'वेड' फेम जिया शंकरचा साखरपुडा! (Photo Credit- X)
आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून जियाने या रोमँटिक क्षणांचे फोटो शेअर करत एक अतिशय भावूक संदेश लिहिला आहे. लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमधील आव्हानांवर भाष्य करताना तिने लिहिले, “कदाचित हे खरे आहे की, जेव्हा तुम्ही अजिबात अपेक्षा करत नाही, तेव्हाच तुम्हाला खरे प्रेम मिळते. पण देवाने इथे माझ्या संयमाची मोठी परीक्षा घेतली. हा प्रवास अजिबात सोपा नव्हता, पण कुठेतरी तो सोपा वाटतही होता. तू हजारो मैल दूर असूनही तुझ्याशी होणारे प्रत्येक संभाषण मला घरासारखी ऊब द्यायचे. आम्ही दररोज एकमेकांची निवड केली.” आयुष्यातील चढ-उतारात करणने दिलेली खंबीर साथ आणि एअरपोर्टवर निरोप देतानाची भावनिक अवस्था यावरही जियाने या पोस्टमध्ये प्रकाश टाकला.
आपल्या भावी आयुष्याबद्दल उत्साह व्यक्त करताना जियाने पुढे लिहिले, “माझा बेस्ट फ्रेंड, माझा सर्वस्व… तुझ्यासोबतचे आयुष्य म्हणजे एक सुंदर अॅडव्हेंचर आणि माझी आवडती रोमँटिक कॉमेडी फिल्म आहे. तुझ्यासोबत उर्वरित आयुष्य घालवण्यासाठी आणि तू माझ्यावर जितके प्रेम केलेस तितकेच तुझ्यावर प्रेम करण्यासाठी मी आता अधिक वाट पाहू शकत नाही. आय लव्ह यू करण.” जियाच्या या पोस्टवरून तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याला दीर्घकाळ प्रसिद्धीच्या झोतातून दूर ठेवले असले, तरी आता तिने आपल्या आयुष्याचा जोडीदार शोधल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिया आणि करणच्या या प्रपोजल फोटोंवर तिचे चाहते, तसेच मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटी मित्रांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेक कलाकारांनी या जोडप्याला नव्या प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोंमधील त्यांचे रोमँटिक बाँडिंग आणि जियाने लिहिलेली भावूक कॅप्शन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आता चाहते या जोडप्याच्या लग्नाच्या तारखेची आणि सोहळ्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.






