( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
उषा नाडकर्णी यांनी सांगितले की, त्या अनेक वर्षांपूर्वीच आपल्या पतीपासून विभक्त झाल्या होत्या. मात्र, त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या कुटुंबाबद्दल मनात कधीही राग किंवा कटुता ठेवली नाही. उलट अनेकदा त्यांनी संपूर्ण नाडकर्णी कुटुंबाला आपल्या घरी जेवणासाठी आमंत्रित केले होते.
त्यांनी मुलाबाबतही भावनिक आठवणी शेअर केल्या. अभिनयाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांच्या आईनेच मुलाचे संगोपन केले. त्यामुळे त्यांचा मुलगा आजही गंमतीने म्हणतो, “तू फक्त मला जन्म दिलास; माझी खरी आई माझी आजी होती.”
उषा नाडकर्णी यांनी सांगितले की, त्या १९८७ पासून एकट्याच राहत आहेत. सुरुवातीच्या काळात एकटे राहण्याची आणि सुरक्षिततेची भीती वाटायची. त्यामुळे रात्री शूटिंग संपल्यानंतर त्या सुरक्षा रक्षकाला घरी सोडण्याची विनंती करत असत. मात्र, आता त्या कोणत्याही भीतीशिवाय एकट्या राहतात.
यावेळी त्यांनी आपल्या मनातील सर्वात मोठी चिंता देखील व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “कधीकधी वाटतं, रात्री माझा मृत्यू झाला तर कोणाला कळेल का?” मात्र, त्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे विनोदाची जोड देत म्हटलं, “शेजारी म्हणतील, ‘अहो, त्या म्हातारीने आज दरवाजा उघडलाच नाही.'”
पडद्यावर कठोर स्वभावाच्या भूमिका साकारणाऱ्या उषा नाडकर्णी यांच्या आयुष्यामागे संघर्ष, त्याग आणि एकटेपणाची वेदना दडलेली असल्याचे त्यांच्या या भावनिक खुलाशातून समोर आले आहे.






