फोटो सौजन्य - Social Media
पोस्टमध्ये गौतमी पाटीलने वारीमध्ये सहभाग घेतल्याचे दिसत आहे. फक्त सहभाग नव्हे तर तिने हरिभक्तांची मनापासून सेवा केली आहे. वारीमध्ये उपस्थित सर्व माउलींना तिने फळदान केले आहे. आहारवाटप केला आहे. तसेच त्यांच्या सोयीसुविंधाचीही काळजी केली आहे. माउलीरुपी तिने स्वयं विठ्ठलाची सेवा केली आहे. वारकऱ्यांसोबत तिने विठ्ठलाच्या आरतीचाही लाभ घेतला आहे. आरतीदरम्यान, गौतमी भक्तीत लीन झालेली दिसून आली आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे वारकऱ्यांसाठी तिने जेवणाचे आयोजन केले आहे.
गौतमीने पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये हरीचा जयजयकार केला आहे. ‘जय जय राम कृष्ण हरी’ लिहीत देवाचे नामस्मरण केले आहे. फक्त गौतमी नव्हे तर महाराष्ट्राची आणखीन एक लाडकी नृत्यांगना बिग बॉस मराठी फेम राधा मुंबईकर-पाटीलने पंढरपूराची वाट धरली आहे. अवघ्या काही दिवसांतच आषाढी एकादशी आहे, त्यामुळे विविध क्षेत्रातली मंडळी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपुराकडे वाटचाल करत आहेत. अशामध्ये राधाने पंढरपुरी जाऊन विठ्ठल रखुमाईच्या भेट घेतली आहे. तसेच पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये ‘माझ्या पांडुरंगाची वारी’ असे नमूद केले आहे.
आषाढी एकादशी!
आषाढी एकादशी २०२६ यंदा २५ जुलै (शनिवार) रोजी साजरी होणार असून तिला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. महाराष्ट्रातील लाखो वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी दाखल होतात. २०२६ मध्ये एकादशी तिथी २४ जुलै रोजी सकाळी ९.१२ वाजता सुरू होऊन २५ जुलै रोजी सकाळी ११.३४ वाजता समाप्त होईल. उपवासाचे पारणे २६ जुलै रोजी सकाळी ५.५८ ते ८.३६ या वेळेत सोडले जाईल. आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा महत्त्वाचा उत्सव मानला जातो.






