फोटो सौजन्य- pinterest
दरवर्षी लाखो वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसोबत विठ्ठलनामाचा गजर करत पंढरपूरकडे पायी प्रस्थान करतात. या वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी अनेक सामाजिक संस्था आणि संघटना पुढाकार घेत असतात. त्याच अनुषंगाने किसन वीर साखर कारखान्याने यंदाही वारकऱ्यांच्या सेवेसाठी पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली आहे.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उदात्त हेतुने राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष वाई-खंडाळा- महाबळेश्वर तालुक्याचे जननायक नामदार मकरंद (आबा) पाटील यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थापनाने वारकऱ्यांच्या सेवार्थ पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सोय केलेली आहे. या पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे पुजन किसन वीर साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव जमदाडे, प्रकाश धुरगुडे, संजय कांबळे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करून तो वारकऱ्यांच्या सेवेसाठी मार्गस्थ करण्यात आला.
आळंदीहून पंढरपूरकडे निघालेल्या या वारीत राज्यभरातून लाखो भाविक सहभागी होतात. विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक वारकरी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करतात. उन्हाळा, पाऊस किंवा इतर कोणत्याही अडचणींची पर्वा न करता ते अखंड हरिनामाच्या गजरात पुढे जात असतात. अशा वेळी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता ही अत्यंत महत्त्वाची बाब ठरते.
आळंदीहून निघालेल्या या वारीमध्ये सर्व स्तरातुन वारकरी सहभागी होत असतात. पंढरीच्या वारीमध्ये फक्त हरिनामाचा गजर आणि पुर्ण भक्तीभावाने वारकरी तल्लीन होत असतात, विठुरायाच्या दर्शनासाठी आतुर झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा प्रवास पायी करून पंढरपुरी दर्शनासाठी जात असतात. या वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उदभवु नये, याकरिता नामदार मकरंदआबा पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील यांच्या नेतृत्वाखालील कारखाना व्यवस्थापनाने वारकऱ्यांच्या सेवेकरिता मागील चार वर्षांपासून कारखान्यामार्फत पाण्याचा टँकर देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता.
कार्यक्रमास कार्यालयीन अधिक्षक उमेश अंबिके, चिफ इंजिनिअर एस. जी. सुर्यवंशी चिफ केमिस्ट व्ही. एम. गाढवे, डिस्टीलरी मॅनेजर उदयसिंह भोसले, एच. आर. मॅनेजर ए.टी. शिंगटे. को-जन मॅनेजर उद्धव शिंगटे, ईडीपी मॅनेजर आर. जे. सणस, लिगल इन्चार्ज शिवाजी फरांदे, परचेस ऑफिसर संतोष जगताप, सुरक्षा अधिकारी पवनकुमार बाबर, प्रदिप जमदाडे सुनिल ससाणे यांच्यासह शेतकरी सभासद उपस्थित होते.
वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा मानली जाते. या भावनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजापुढे सेवाभाव, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण करणारा ठरत आहे.






