फोटो सौजन्य - Social Media
‘या’ नव्या सिनेमात काय आहे विशेष गोष्ट?
पोस्ट करण्यात आलेल्या Poster मध्ये अनेक विशेष गोष्टी आहेत. सगळ्यात मुख्य म्हणजे या सिनेमात Instagram वर हवा करणारी संपूर्ण Orange Juice Gang म्हणजेच नील सालेकर (Just Neel Things), सिद्धांत सरफरे तसेच करण सोनावणे झळकणार आहे. त्यामुळे त्यांच्या Social Media वरील चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे.
जाहीर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये आणखीन एक विशिष्ट गोष्ट म्हणजे या पोस्टरच्या वरच्याबाजूला “हॉरर कॉमेडी विश्वातला गेम चेंजर येतोय” त्यामुळे मराठी सिनेचाहत्यांमध्ये या सिनेमाविषयी एक वेगळीच उत्कंठा लागून आहे. असे 7 पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून या सगळ्यांमध्ये एक गोष्ट Common आहे ती म्हणजे ‘अन्न-वस्त्र-निवारा’! दरम्यान, प्रत्येकाच्या डोळ्यांवर पैशांची पट्टी आहे. एका पोस्टरमध्ये कुणाला Content Creator दाखवण्यात आले आहे तर कुणाला व्यावसायिक दाखवण्यात आले आहे. कुणी ‘वसई-महालक्ष्मी-वसई’ करणारा सामान्य मराठी माणूस आहे तर कुणी सट्टेबाजीत वरपर्यंत पोहचलेला! एक परीक्षेच्या वादळांमध्ये अडकलाय तर एक बाप आपल्या मुलीच्या लग्नखर्चात पण सगळ्यांच्या डोळ्यावर मात्र पैशांची पट्टी आहे.
हा सिनेमा काय असणार? या सिनेमाचे नाव काय असणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळणार असून. सिनेमाची Announcement आज होणार आहे. सिनेमा Zeestudios Marathi प्रस्तुत असून सिनेमाचे दिग्दर्शन रामचंद्र गावकरने केले आहे.






