( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
ईशा केसकर आपल्या परखड आणि स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच ‘राजश्री मराठी’ ला मुलाखतीत तिने अभिनयातील बोल्ड सीन आणि कलाकारांच्या भूमिका यावर भाष्य केले आहे. तिचे हे विधान सध्या मनोरंजन विश्वात मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहे.
”आयुष्यात आपण काही तत्तव आवर्जून पाळतो.. या तत्त्वांमुळे कधी कोणत्या भूमिकेसाठी नकार दिला आहे का? या प्रश्नावर ईशाने सांगितले, ”हो.. असे एक- दोन प्रोजेक्ट होतो. मला सांगण्यात आलं होते की, तुम्हाला स्विमिंग पूलमध्ये जावं लागेल. अर्थात ती भूमिका अशी काही नव्हती.. फक्त ऑब्जेक्टिफिकेशन त्यांना ते करायचे होते.”
ईशाने पुढे सांगितले, ”मी वेगळ्या धाटणीची अभिनेत्री आहे. प्रेक्षकांसाठी कलाकराने नग्न असायला हवं या विचारांची मी आहे. असं ईशाने स्पष्ट केलं. तुमच्या भूमिकेसाठी जर त्या पॉइंटला कपडे काढणं गरजेचं असेल.. तर ते कलाकरांने केलं पाहिजे.. स्त्री व पुरूष असा भेद न करता.. पण, तुम्ही मला विनाकारण ऑब्जेक्टिफिकेशन करायला लावत असाल.. तर मी तुमच्या दारातही परत उभी राहणार नाही..”
पुढे ती म्हणाली, एकंदर काय तर कथेची गरज असेल तर मी काहीह करेन पण, उगाचच काहीतरी करणार नाही. सॉरी.. गेले ते दिवस! आधी मी कदाचित अशा भूमिका केल्या असत्या.. कारण तेव्हा मला फार कळत नव्हतं. पण , आता नाही” अशी स्पष्ट मत ईशाने मांडलं आहे.






