मुंबई : गोवा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये आता राजकीय आरोपांच्या फैऱ्या झाडायला सुरूवात झाली आहे. आरोप- प्रत्योरोपांचा फेरा मुंबई पालिकेतील उंदीर मारण्याचा घोटाळ्यापर्यंत येऊन पोहोचला. या प्रकरणावरून भाजपने पालिकेला टारगेट केलं असताना, पालिकेबद्दल बोलण्याआधी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी सचिवालयातील उंदीर मारण्याच्या कॅान्ट्रक्ट बद्दल स्पष्टीकरण द्यावं बोला. असं सवाल महापौर किशोरी पेडणेकरांनी केला.
मुंबई महापालिकेत उंदीर मारण्याचा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपनं स्थायी समितीत केला आहे. मुंबईकरांचा त्रास दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या किटक नाशक विभागाच्या माध्यमातून उंदरांचा नायनाट करण्यात येतो. उंदिर मारण्याबाबतचा 2 कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आला होता. त्यात ए ते टी विभागात म्हणजेच मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात 1 कोटी रुपये खर्च करून उंदिर मारण्यात आल्याचे म्हटले आहे, अशी माहिती भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे.
[read_also content=”https://www.navarashtra.com/maharashtra/national-commission-for-schedule-casts-gave-relief-to-sameer-wankhede-nrsr-236878.html अनुसूचित जाती आयोगाचा मोठा निर्णय, नवाब मलिकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश – समीर वानखेडेंच्या तक्रारीची दखल”]
मुंबई पालिकेच्या (BMC) कीटकनाशक विभागाकाडून (Department of Pesticides) त्रासदायक ठरणाऱ्या उंदीर (Rat) मारण्यासाठी प्रयत्न केले जातात. यासाठी पालिकेने पाच प्रभागात १ कोटी रुपये इतकी रक्कम खर्च करण्यात आली आहे. मात्र या कंत्राटावरून भाजपने (BJP) शुक्रवारी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. पालिकेच्या प्रस्तावात नेमके किती उंदीर, कोणत्या ठिकाणी मारण्यात आले, त्यांची उत्पत्ती तसेच उपाययोजना आदी मुद्दे उपस्थित करण्यात आले. यात घोटाळा झाला असून वेळ आल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही भाजपने दिला. याबद्दल बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सचिवालयात उंदीर मारण्याच्या घोटाळ्याबाबत प्रश्न उपस्थित केला. सचिवालयातील किती उंदीर मारले याबद्दल भाजपनं स्पष्टीकरण द्यावं असं त्या म्हणाल्या. तुम्हाला हिशोब द्यायचा असेल तर केंद्राने दिलेल्या आश्वासनाचा हिशोब द्या असाही त्यांनी भाजपला टोला लगावला.
[read_also content=”https://www.navarashtra.com/kolhapur/paschim-maharashtra/kolhapur/car-burn-in-ajara-kolhapur-4-peoples-rescued-nrka-236923.html आजऱ्याजवळ कारने घेतला अचानक पेट; गाडीत होते चौघे पण…”]