(फोटो सौजन्य – social media)
भारतामध्ये दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने होते. भारतातील जास्तीत जास्त लोक चहाचे सेवन करून दिवसाचा श्री गणेशा करतात तर बहुतांश लोक कॉफी पिऊन करतात. काही लोकांना चहा आणि कॉफीचे इतके वेड असते की दिवसातून एकदा नव्हे तर बऱ्याच वेळा चहा किंवा कॉफी पित असतात. भारतातील बहुतांश लोकसंख्या हा नोकरदार वर्ग आहे. प्रत्येकाला स्वतःच्या हाताने चहा बनवणे किंवा कॉफी बनवणे नेहमी शक्य नसते. अशावेळी बहुतांश वर्ग ऑफिसमध्ये असलेल्या कॉफी मशीनवर निर्भर असतो. मुळात, चहा किंवा कॉफीच्या सेवनात काही मर्यादा असणे गरजेचे आहे. कोणतीही गोष्ट अति केल्यास ती अंगाशी येतेच. पण काही जणांना कॉफीची इतकी ओढ असते की कॉफी कितीही प्यायला शिवाय त्यांचे काही मन भरत नाही. अशावेळी अनेक जण कॉफी मशीनमधून कॉफी पितात.
पण तुम्हाला माहिती आहे का? कॉफी मशीन मधून येणारी कॉफी आरोग्यास किती घातक आहे? जर तुम्ही ही कॉफी मशीन ची कॉफी मर्यादेच्या बाहेर पीत असाल, तर हा लेख नक्की वाचा. कॉफी मशीन वर संशोधन करण्यात आले आहे. त्या संशोधनातून अशा काही गोष्टी समोर आल्या आहेत ज्याने तुमचा थरकाप उडणार आहे. तुम्हाला माहिती आहे का? कॉफी मशीन मधून मिळणारी कॉफी आरोग्यास घातक असू शकते. चला तर मग पाहूया, संशोधन काय म्हणते?
ही स्टडी Nutrition, Metabolism and Cardiovascular Diseases या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली आहे. या संशोधनातून “कॉफी मशीन आणि त्यातून येणारी कॉफी आणि त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम” या सगळ्या बाबी समोर आल्या आहेत. मशीन कॉफीमुळे LDL म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल वाढतो. या वाढीमुळे हृदयविकाराचा धोका संभावू शकतो. एक नव्हे तर एकूण 14 कॉफी मशीनवर हे संशोधन करण्यात आले आहे. हे संशोधन स्वीडन या देशात करण्यात आले आहे.
संशोधनात निष्करणास आले आहे की कॉफीमध्ये कॅफेस्टॉल आणि काहवेऑल ही संयुगे आढळतात. जर कॉफी मशीनमध्ये योग्य फिल्टरिंग सिस्टम नसल्यास ही संयुगे अति प्रमाणात शरीरात येतात, जे शरीरास हानिकारक ठरू शकतात. या संशोधनात तीन प्रकारच्या मशीनचा अभ्यास केला गेला : मेटल फिल्टर मशीन, लिक्विड कॉन्सन्ट्रेट कॉफी मशीन आणि इन्स्टंट कॉफी मशीन. यातील आरोग्यासाठी सर्वात धोकादायक कॉफी बनवून देणारी मशीन म्हणजे ती मशीन ज्यात फिल्टर वापरला जात नाही. जर तुम्हाला तुमच्या ऑफिससाठी कॉफी मशीन घ्यायची आहे तर त्याची फिल्टरिंग सिस्टम योग्य आहे की नाही हे तपासून घ्यावे आणि मगच कॉफी मशीन घेण्याचा निर्णय घ्यावा.
नवऱ्याच्या मुखातून ‘या’ गोष्टी ऐकण्यास पत्नीचे आतुरतात कान; आजच ऐकवा, बायको होईल खुश
पण असे नाही की योग्य फिल्टरिंग सिस्टम असल्यास त्यातून मिळणारी कॉफी आरोग्यावर काहीच दुष्परिणाम करत नाही. मुळात, आठवड्याला फक्त तीन कप पेपर फिल्टर कॉफी घेतल्यास शरीरातील एलडीएल कमी होतो. कॉफी मशीन मधील कॉफी पिऊन शरीराला होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी शरीराची हालचाल नियमित ठेवा. मुळात, ज्यांच्या शरीराची हालचाल कमी त्यांना धोका अधिक असतो. आणि जमलं तर ऑफिस मधील कॉफी मशीनची कॉफी पिण्याऐवजी काहीतरी आरोग्यदायी पर्याय घरातूनच आणावेत.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.