(फोटो सौजन्य:Pinterest)
आपली झोप आपल्या आरोग्यावर परिणाम करत असते. अनेकदा असे होते की आपण गाढ झोपेत असलो की अचानक मध्यरात्री आपली झोपमोड होते. जर सारखे सारखे रात्री 3 किंवा पहाटे 5 वाजता तुमची झोपमोड होत असेल, तर तुम्ही एकटेच नाही ज्यांच्यासोबत हे घडत आहे. होय, तुमच्यासारखे अनेक लोक आहेत ज्यांच्यासोबत असे घडते. योग्य झोप न मिळाल्याने दिवसभरात कमी ऊर्जा पातळी आणि चिडचिडेपणा यासारख्या समस्या कायम राहतात.
रात्री अचानक झोप न लागणे ही एक सामान्य समस्या आहे. अनेक वेळा शौचास किंवा तहान लागल्याने रात्री झोप भंग पावते. अनेक वेळा चुकीच्या स्थितीमुळे किंवा वाईट स्वप्नांमुळे झोपेमध्ये व्यत्यय येतो, जे सामान्य आहे, परंतु जर तुम्ही दररोज रात्री उठत असाल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. दररोज पहाटे 1 ते 3 दरम्यान झोप न येणे किंवा झोप मोडल्यानंतर पुन्हा झोप न येणे हे अनेक आजारांचे लक्षण असू शकते. झोपेचा त्रास होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. वाढत्या वयामुळे झोपेचे चक्रही बदलते. काहीवेळा औषधांमुळेही झोपेचा त्रास होऊ शकतो.
Holi 2025: भारतात या भागांत खेळली जात नाही होळी; इथली लोक रंगांना हातही लावत नाहीत
तणाव
तुमची झोप रोज रात्री भंग पावत असेल, जर तुम्ही जागे झाल्यानंतर झोपू शकत नसाल तर ते तणावाचे लक्षण असू शकते. दीर्घकाळ तणावाखाली राहिल्यानेही नैराश्य येऊ शकते. जर तुमची झोप दररोज खंडित होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका तर वेळीच यावर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
लिव्हरची समस्या
जर तुम्ही रात्री गाढ झोपेतून अचानक जागे झाले तर ते यकृताशी संबंधित समस्येचे लक्षण असू शकते. जर तुमची झोप दररोज खंडित होत असेल तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नये. जर्नल ऑफ नेचर अँड सायन्स ऑफ स्लीपच्या रिपोर्टनुसार, रात्री अचानक झोप न लागणे हे यकृत खराब झाल्याचे लक्षण असू शकते. त्यामुळे पुन्हा पुन्हा झोपमोड होत असल्यास यावर डॉक्तरांचा सल्ला घ्या.
फुफ्फुसाशी संबंधित समस्या
दररोज रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत तुमची झोप कमी झाली तर फुफ्फुसाशी संबंधित समस्या असू शकते. याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते त्यामुळे झोपेचा त्रास होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका तर वेळीच यावर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.