बंदुकीचा धाक दाखवून आधी 10 लाख लुटले अन् नंतर पाया पडून माफी मागितली

उत्तर प्रदेशातील मैनपुरीमधून (Mainpuri Crime) चोरीची अनोखी घटना समोर आली आहे. एका सेवानिवृत्त शिक्षिकेच्या घरी चोरी झाली. शुक्रवारी सायंकाळी उशिरा मास्क घातलेल्या तीन तरुणांनी एका सेवानिवृत्त शिक्षिकेच्या घरातून बंदुकीचा धाक दाखवून 10 लाख रुपयांचा ऐवज लुटला.

    लखनौ : उत्तर प्रदेशातील मैनपुरीमधून (Mainpuri Crime) चोरीची अनोखी घटना समोर आली आहे. एका सेवानिवृत्त शिक्षिकेच्या घरी चोरी झाली. शुक्रवारी सायंकाळी उशिरा मास्क घातलेल्या तीन तरुणांनी एका सेवानिवृत्त शिक्षिकेच्या घरातून बंदुकीचा धाक दाखवून 10 लाख रुपयांचा ऐवज लुटला. मात्र, निघताना या चोरांनी अशी कृती केली की सर्वांनाच आश्चर्य वाटले. परत जाताना चोर निवृत्त शिक्षिका आणि त्यांच्या पतीच्या पाया पडले.

    कोतवाली भागातील कृष्णा नगर येथील रहिवासी असलेल्या सेवानिवृत्त शिक्षिका स्नेहलता यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन मुखवटा घातलेले बदमाश घरात घुसले होते. त्यांनी शिक्षिका आणि त्यांच्या पतीला बंदुकीचा धाक दाखवला. दागिने व काही रोख रक्कम मिळून एकूण 10 लाख रुपयांचा ऐवज चोरण्यात आला.

    संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून रात्री साडेदहापर्यंत चोरांनी घराची उलथापालथ केली. ही उलथापालथ केल्यानंतर चोरांनी जोडप्याची माफी मागितली. ‘आम्हाला माफ करा…आम्ही नाईलाजाने चोरी करत आहोत, खूप भूक लागल्याने बर्फीचा पुडादेखील सोबत घेऊन जात आहोत,’ असे म्हणत चोरांनी तेथून पळ काढला.