हृदयद्रावक! कार ड्रायव्हिंग शिकणाऱ्या तरुणाने चार जणांना चिरडलं; १० महिन्याच्या बाळाचा मृत्यू
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. सीतापूर हायवेवर इटौंजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिंघामऊ गावाजवळ ही घटना घडली आहे. एका रिसॉर्टवर काम करणाऱ्या सुपरवायझरचं कार ड्रायव्हिंग शिकताना नियंत्रण सुटलं आणि रस्त्यावरून जात असलेल्या चार जणांना चिरडलं. या भीषण अपघातात एका दहा महिन्याच्या निष्पाप बाळाचा मृत्यू झाला असून त्याची आई आणि अन्य दोन जण जखमी झाले आहेत.
पुण्यात दोन दिवसात सहा ठिकाणी घरफोड्या; लाखो रुपयांवर मारला डल्ला
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार संध्याकाळी सुपरवायझर सुनील रिसॉर्ट साइटवर कार चावायला शिकत होता. त्याचवेळी अचानक कारवरचं नियंक्षण सुटलं आणि कार रस्त्याच्या बाजूला गेली आणि रस्त्यावरून जात असलेल्या एक महिला, दोन पुरुष आणि एका लहान बाळाला चिरडलं. बाळाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. बाळाची आई पूनम यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीकेटी परिसरातील मामपूर गावचे राहणारे मजूर गया प्रसाद यांचीही स्थिती गंभीर आहे.
Karjat Crime News : कुर्बानीकरीता400 ते 500 गोमातांचा देणार होते बळी; गोरक्षकांनी उधळला कट
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. स्थानिकांनी आरोप केला आहे की गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला रिसॉर्ट मालकाने घटनास्थळावरून पळवून नेलं. मृत बाळाच्या वडिलांनी सांगितलं की त्यांची पत्नी मजुरी करून बाहेर पडत असताना ही दुर्दैवी घटना घडली. आरोपी रिसॉर्टवर आलेल्या पाहुण्यांची कार चालवत होता. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. मात्र, अपघात घडवणारा युवक अद्याप फरार आहे. पीडित कुटुंब आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी करत आहे.