
एसयूव्हीचा वेग बहुधा होता आणि समोरून येणाऱ्या ट्रकने अचानक ब्रेक लावला, त्यामुळे ट्रकला धडक बसली.
कोटा: ऐन दिवाळीच्या दिवशी राजस्थानमधे रस्ते अपघाता एका कुटुंबातील चौघांना जिव गमवावा लागला. बुंदी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग-52 वर रविवारी सकाळी मध्य प्रदेशातील एका कुटुंबातील चार जणांचा अपघाती मृत्यू झाला. हे कुटंब मध्यप्रदेशहून पुष्करला जात असताना हिंदोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवी सिंह (50), त्यांची पत्नी मानखोर कंवर (45), भाऊ राजाराम (40) आणि पुतण्या जितेंद्र (20) अशी मृतांची नावे आहेत, ते मध्य प्रदेशातील आगर-मालवा जिल्ह्यातील गंगुखेडी गावचे रहिवासी आहेत. हिंदोली पोलिस स्टेशनचे अधिकारी मनोज सिकरवाल यांनी सांगितले की, हिंदोली शहराजवळ चार जणांना घेऊन जाणाऱ्या एसयूव्हीने एका ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात 12.30 च्या सुमारास झाला.
सिकरवाल यांच्या म्हणण्यानुसार, एसयूव्हीचा वेग बहुधा होता आणि समोरून येणाऱ्या ट्रकने अचानक ब्रेक लावला, त्यामुळे ट्रकला धडक बसली. ते म्हणाले की, तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सिकरवाल यांच्या म्हणण्यानुसार, ट्रक चालकाने गाडी सोडून घटनास्थळावरून पळ काढला असून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या चारही मृतदेह शवागारात ठेवण्यात आले असून, नातेवाईक आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.