राज्यसभेच्या 56 पैकी 41 जागा बिनविरोध; उत्तर प्रदेश, हिमाचल, कर्नाटक राज्यात होणार निवडणूक

लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरातील राज्यसभेच्या 56 जागांपैकी 41 जागांवर प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात असल्याने हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र राज्यसभेच्या 15 जागांवर 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

    नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरातील राज्यसभेच्या 56 जागांपैकी 41 जागांवर प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात असल्याने हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र, राज्यसभेच्या 15 जागांवर 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेची निवडणूक होणाऱ्या या 15 जागांमध्ये उत्तर प्रदेशमधील 10, हिमाचल प्रदेशमधील एक आणि कर्नाटकमधील 4 जागांचा समावेश आहे.

    राज्यसभा निवडणुकीत बिनविरोध निवड जाहीर झालेल्या 41 अतिरिक्त मतांची गरज आहे. तर समाजवादी पक्षाला तीन उमेदवार विजयी करण्यासाठी 111 आमदारांच्या पाठिंब्याची जे.पी. नड्डा, भाजपात नव्याने आलेले अशोक चव्हाण, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि एल. मुरुगन यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशमधील 10 जागांसाठी मतदान होणार आहे. येथील पक्षीय बलाबलानुसार भाजपाचे ७ आणि समाजवादी पक्षाचे 3 उमेदवार विजयी होणार होते. मात्र, भाजपने आठवा उमेदवार दिल्याने निवडणूक रंगतदार झाली आहे. आठही उमेदवारांना विजयी करण्यासाठी भाजपाला 296 मतांची आवश्यकता आहे. मात्र, सध्या भाजपकडे 286 आमदारांचा पाठिंबा आहे.

    भाजपला आठवी जागा निवडून आणण्यासाठी 10 उमेदवारांमध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या दोन आणि बसपाच्या एका आमदाराचं मत निर्णायक ठरणार आहे. हिमाचल प्रदेशमधील एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे.

    68 विधानसभा सदस्य असलेल्या हिमाचलमध्ये विजयासाठी 35 मतांची आवश्यकता आहे. येथे काँग्रेसकडे 40 आमदार आहेत. तर 3 आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे. अशा परिस्थितीत 40 आमदार असलेल्या काँग्रेसचा विजय निश्चित आहे.