‘नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे’, कर्नाटकातील ‘या’ व्यक्तीने अंगठा कापून काली मातेला केला अर्पण!

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे यासाठी कर्नाटकतील एका व्यक्तीने स्वताच: बोट कापून काली मातेला अर्पण केलं.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PN Narendra Modi) यांचे केवळ देशभरात नव्हे तर जगभरात चाहते आहेत. देशात अनेक ठिकाणी त्यांच्या चाहत्यांनी त्यांच मंदिरही बांधलय. चाहत्यांकडून आपल्या आवडत्या व्यक्तिला काही भेटवस्तू देण्यात येते. मात्र, कर्नाटकातील पंतप्रधान मोंदींच्या चाहत्याने त्यांच्यासाठी जे केलं ते अत्यंत धक्कादायक आहे. येथील मोदींच्या कट्टर चाहत्याने ते तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी प्रार्थना केली. पूजेनंतर त्यांनी डाव्या हाताची तर्जनी कापली आणि ती देवी कालीला अर्पण केली. अरुण वेर्णेकर (Arun Vernekar) असे या व्यक्तीचे नाव आहे. यानंतर त्यांने आपल्या घराच्या भिंतीवर रक्ताने माखलेल्या बोटाने ‘मोदी इज द ग्रेट’ असे लिहिले. अरुणने आपल्या घरात मोदींचे मंदिरही बांधले आहे जिथे ते रोज प्रार्थना करतात.

  नेमका प्रकार काय

  कर्नाटकातील कारवार शहरातील सोनारवाडा भागातील हा प्रकार आहे. येथे राहणारे अरुण वेर्णेकर यांनी त्यांच्या घरात पंतुप्रधान मोदींचे मंदिर बांधले आहे. तो येथे नियमितपणे विशेष पूजा देखील करतो. या मंदिरात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अमित शहा यांचेही फोटो आहेत. अरुण हे मोंदीचे कट्टर समर्थक आहेत. त्यांनी आपले बोट कापून पंतप्रधान मोदींसाठी देवी कालीला अर्पण केले आहे. मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी त्यांनी काली देवीची प्रार्थना केली आणि त्यांचे बोट कापून प्रसाद म्हणून अर्पण केले आहे.

  अरुण वेर्णेकर याचं काय म्हणणं

  अरुण यांनी दावा केला की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली शेजारी देशांसोबत, विशेषत: जम्मू-काश्मीरबाबतची अशांतता कमी झाली आहे. ते म्हणाले, ‘पूर्वी काश्मीरमधून दहशतवादी कारवाया आणि जवानांच्या मृत्यूच्या बातम्या येत होत्या, पण आता या भागात शांतता आहे. देशाच्या विकासासाठी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची पुन्हा एकदा गरज आहे.

  कोण आहे अरुण वेर्णेकर

  रिपोर्टनुसार, अरुण वेर्णेकर यांनी यापूर्वी मुंबई सिनेसृष्टीत काम केले होते. पण, आता ते आता कारवार शहरात राहताता आणि आपल्या वृद्ध आईची काळजी घेतात. आपल्या वृद्ध आईची काळजी घेण्यासाठी त्यांनी मुंबई चित्रपटसृष्टीतील गजबजलेल्या वातावरणातून येथे येण्याचा निर्णय घेतला. त्याने वैयक्तिक महत्त्वाकांक्षा किंवा ध्येयांपेक्षा त्याच्या आईच्या सुखसोयींना प्राधान्य दिले. ते अविवाहित आहे.