पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा जात असतानाच महिलेची वाहनासमोर उडी; सुरक्षा यंत्रणांची चांगलीच दमछाक

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेमध्ये पुन्हा एक मोठी चूक झाली. पंतप्रधानांच्या गाडीसमोर अचानक एका महिलेने उडी घेतली. चालकाने प्रसंगावधान साधून अचानक ब्रेक मारले. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.

    रांची : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेमध्ये पुन्हा एक मोठी चूक झाली. पंतप्रधानांच्या गाडीसमोर अचानक एका महिलेने उडी घेतली. चालकाने प्रसंगावधान साधून अचानक ब्रेक मारले. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.

    पंतप्रधान बुधवारी रांचीच्या दौऱ्यावर होते. एका महिलेने अचानक गाडीसमोर येण्याचा प्रयत्न केला. पण सुरक्षा यंत्रणांनी वेळीच खबरदारी घेतल्याने संभाव्य अपघात टळला. या महिलेला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रांचीमधील कोतवाली ठाणा आणि लालपूर ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे. महिलेला काहीतरी कौटुंबिक अडचण असून, ती पंतप्रधानांना भेटण्यासाठी इच्छुक होती, असे सांगितले जात आहे.

    दरम्यान, संबंधित महिला पंतप्रधान मोदी येण्याची वाट बघत होती. त्यांची गाडी दिसताच तिने गाडीसमोर उडी घेतली. पंतप्रधानांच्या ताफ्यातील सुरक्षा यंत्रणेमध्ये कुचराई झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.