Maharashtra Breaking News Updates Today:
Maharashtra Rain Update: हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली आहे. गेले अनेक दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. राज्यातील पाणीसाठा कमी झपाट्याने कमी होत होता. मात्र आता पावसाने जोर पकडला असून अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस सुरू झाला आहे. अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कालपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे , पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
02 Jul 2026 05:45 PM (IST)
दररोजच्या वाढत्या कामाच्या ताणातून थोडा विरंगुळा मिळावा म्हणून मुंबईतील पाच ऑफिसमधील मित्रांनी दोन दिवसांसाठी अलिबागला जाण्याचा बेत आखला. रविवारच्या रात्री राणू हुरे, दीप देशमुख, पिंटू ठाणावाला, मॉन्टी पवार आणि मिराज हुसेन हे पाचही जण गाण्यांच्या तालावर, हसत-खेळत अलिबागच्या दिशेने निघाले. प्रवास निर्विघ्न झाला. कार्ले खिंडही त्यांनी सहज पार केली. मात्र, रात्रीचे जवळपास दीड वाजले तेव्हा राणूच्या मनात एकच प्रश्न आला, “अलिबागला तर पोहोचलो… पण राहायचं कुठे?” त्यांचं बजेट मर्यादित होतं. त्यामुळे फिरणं आणि खाण्यापिण्यापुरतेच पैसे त्यांनी आणले होते. राणूने पिंटूला जवळपास स्वस्तात राहण्याची व्यवस्था शोधायला सांगितली, पण इंटरनेटवर त्यांच्या बजेटमध्ये एकही रूम उपलब्ध नव्हती. तेवढ्यात मॉन्टी म्हणाला, “चार तासांसाठी पैसे का वाया घालवायचे? सकाळी फिरायचंच आहे… बीचवरच बसूया.” हे ऐकताच पिंटूचा चेहरा फटकन उतरला. तो अडखळत म्हणाला, “क… क… काय? या वेळेला… समुद्रकिनारी?” पण त्याच्या भीतीकडे दुर्लक्ष करत सगळ्यांनी गाडी अलिबागमधील एका निर्जन समुद्रकिनाऱ्याकडे वळवली.
02 Jul 2026 05:30 PM (IST)
Thailand Accident News in Marathi : बँकॉक : थायलंडमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. मुकदाहान प्रांतात तीर्थयात्रेसाठी पायी निघालेल्या बौद्ध भिक्षूंच्या समूहावर एका अल्पवीयन मुलाने ट्रक चढवला आहे. यामध्ये ८ भिक्षूंचा मृत्यू झाला असून ११ वर्षयी मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस सध्या अपघाताच्या नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत.
02 Jul 2026 05:15 PM (IST)
WhatsApp Tips Marathi : आजच्या डिजिटल युगात लोकेशन शेअरिंग हे दैनंदिन संवादाचा महत्त्वाचा भाग बनले आहे. मित्र-मैत्रिणी, कुटुंबीय किंवा सहकाऱ्यांना आपले अचूक ठिकाण सांगण्यासाठी WhatsApp आणि Instagram सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विविध सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, अनेकांच्या मनात प्रश्न असतो की, एखाद्या व्यक्तीची लोकेशन त्याच्या परवानगीशिवाय पाहता येते का? व्हॉट्सॲप ‘लाईव्ह लोकेशन’ फीचर देते, तर इंस्टाग्राम DM द्वारे लोकेशन शेअर करण्याची सुविधा देते.
02 Jul 2026 05:00 PM (IST)
Mumbai-Pune Highway: राज्यातील सर्वाधिक गजबजलेल्या आणि वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर सध्या प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. देहू रोड ते वडगाव फाटा या दरम्यानच्या विस्तृत पट्ट्यात महामार्गावरील पथदिवे अनेक ठिकाणी पूर्णपणे बंद अवस्थेत असल्याने हा संपूर्ण परिसर रात्रीच्या वेळी अंधाराच्या साम्राज्यात बुडून जात आहे. यामुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, प्रशासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे येथे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
02 Jul 2026 04:57 PM (IST)
ठाकरे गटातील सलग घडामोडींमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. सहा खासदारांच्या पक्षांतरानंतर आता माजी मंत्री सचिन अहिर यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी नेत्यांकडून ठाकरे गटावर टीकेची झोड उठवली जात असून, प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी थेट संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळजनक दावा केला. "संजय राऊत यांच्या बेताल विधानांमुळे पक्षात मोठी नाराजी आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांना इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी राहिलं होतं," असा दावा बच्चू कडू यांनी केला. मात्र, या दाव्याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
02 Jul 2026 04:47 PM (IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षांतर, आमदार-खासदारांच्या फुटी आणि सध्याच्या राजकारणावर केलेल्या परखड टीकेनंतर शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत, पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांबाबत अशी भाषा वापरणे योग्य नसल्याचे म्हटले. वाचा सविस्तर...
02 Jul 2026 04:37 PM (IST)
मुंबईत सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला मोठा दिलासा मिळाला आहे. शहराला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली आहे. बुधवारी सकाळी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, या जलाशयांमध्ये एकूण १,०३,८७१ दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे, जे त्यांच्या एकूण क्षमतेच्या ७.३१ टक्के इतके आहे. मंगळवारी हा साठा ९७,६६६ दशलक्ष लिटर (६.७५ टक्के) इतका होता. पाणीसाठ्यातील या वाढीमुळे बीएमसी (BMC) प्रशासनाला दिलासा मिळाला असून, भविष्यातील पाणी उपलब्धतेबाबत आशा पल्लवित झाल्या आहेत. वाचा सविस्तर...
02 Jul 2026 04:27 PM (IST)
रेल्वे भरती बोर्डाने (RRB) ग्रुप डी भरती २०२६ च्या कॉम्प्युटर आधारित परीक्षेचा (CBT) निकाल जाहीर केला आहे. यासोबतच सर्व झोनचा कट ऑफ आणि उमेदवारांचे स्कोअर कार्डही प्रसिद्ध केले आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, ते आता आपापल्या प्रादेशिक रेल्वे भरती बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन निकाल आणि स्कोअर कार्ड पाहू शकतात. यावेळचा कटऑफ अपेक्षेपेक्षा जास्त राहिला असून अनेक झोनमध्ये ओबीसी (OBC) प्रवर्गाचा कटऑफ सामान्य (UR) प्रवर्गाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. वाचा सविस्तर...
02 Jul 2026 04:17 PM (IST)
अंबरनाथ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधाच्या संशयातून एका तरुणाला अमानुष मारहाण केल्याचे समोर आले आहे. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच याप्रकरणी भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. वाचा सविस्तर...
02 Jul 2026 04:07 PM (IST)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदारांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केला. या बंडखोरीच्या दरम्यान अनेक घडामोडीही घडल्या. ठाकरेंची साथ सोडल्यानंतर मुंबईतील वाय बी सेंटर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या खासदारांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. पण महत्त्वाची बाब म्हणजे, खासदारांच्या बंडखोरीच्या काही दिवस आधीपासून हे खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या घडामोडींसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला आहे. वाचा सविस्तर...
02 Jul 2026 04:00 PM (IST)
अंबरनाथ: अंबरनाथ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधाच्या संशयातून एका तरुणाला अमानुष मारहाण केल्याचे समोर आले आहे. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच याप्रकरणी भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. नेमकं काय घडलं?
02 Jul 2026 03:55 PM (IST)
मुंबई: मुंबईत सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला मोठा दिलासा मिळाला आहे. शहराला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली आहे. बुधवारी सकाळी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, या जलाशयांमध्ये एकूण १,०३,८७१ दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे, जे त्यांच्या एकूण क्षमतेच्या ७.३१ टक्के इतके आहे. मंगळवारी हा साठा ९७,६६६ दशलक्ष लिटर (६.७५ टक्के) इतका होता. पाणीसाठ्यातील या वाढीमुळे बीएमसी (BMC) प्रशासनाला दिलासा मिळाला असून, भविष्यातील पाणी उपलब्धतेबाबत आशा पल्लवित झाल्या आहेत. वाचा सविस्तर
02 Jul 2026 03:50 PM (IST)
RRB Group D Result 2026: रेल्वे भरती बोर्डाने (RRB) ग्रुप डी भरती २०२६ च्या कॉम्प्युटर आधारित परीक्षेचा (CBT) निकाल जाहीर केला आहे. यासोबतच सर्व झोनचा कट ऑफ आणि उमेदवारांचे स्कोअर कार्डही प्रसिद्ध केले आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, ते आता आपापल्या प्रादेशिक रेल्वे भरती बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन निकाल आणि स्कोअर कार्ड पाहू शकतात. यावेळचा कटऑफ अपेक्षेपेक्षा जास्त राहिला असून अनेक झोनमध्ये ओबीसी (OBC) प्रवर्गाचा कटऑफ सामान्य (UR) प्रवर्गाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. वाचा सविस्तर
02 Jul 2026 03:45 PM (IST)
CM Devendra Fadnavis revelation: शिवसेना ठाकरे गटाचे खासदारांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केला. या बंडखोरीच्या दरम्यान अनेक घडामोडीही घडल्या. ठाकरेंची साथ सोडल्यानंतर मुंबईतील वाय बी सेंटर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या खासदारांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. पण महत्त्वाची बाब म्हणजे, खासदारांच्या बंडखोरीच्या काही दिवस आधीपासून हे खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या घडामोडींसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला आहे. वाचा सविस्तर
02 Jul 2026 03:40 PM (IST)
पुणे : पुण्यातील लोहगड किल्ल्यावर उद्योजक केतन अग्रवाल याचा दरीत पडून झालेला मृत्यू सध्या चर्चेचा विषय आहे. देशभरात या प्रकरणावर चर्चा होत आहे. या प्रकरणात रोज नवीन खुलासेही समोर येत आहेत. अशातच आता केतन अग्रवालला टक्कल होते म्हणून लग्न करायचे नव्हते, असे सियाने पोलिस तपासात सांगितले आणि हाच धागा पकडून डॉ. मुस्कान सोनी हिने केतनची खिल्ली उडवली होती. मात्र असे करणे डॉ. सोनीला चांगलेच महागात पडले असून, तिच्यावर ऑल इंडिया डेंटल स्टुडंट्स अॅण्ड सर्जन्स असोसिएशनने शिस्तभंगाची कारवाई केली आहे. तसेच पाच वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे. वाचा सविस्तर
02 Jul 2026 03:35 PM (IST)
विजय काते, भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात पावसाने जोर धरताच धोकादायक झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अवघ्या तीन दिवसांत शहरातील विविध भागांत सुमारे २० झाडे रस्त्यावर कोसळल्याच्या घटना घडल्या असून, या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापैकी एका गंभीर अपघातात दुचाकीस्वाराच्या मानेला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. महापालिकेने शहरातील रस्त्यांच्या कडेला विविध प्रकारची झाडे लावली आहेत. यामध्ये काही झाडे महापालिकेच्या स्थापनेपूर्वीची असून काही खासगी मालकीची आहेत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून ती हटविणे तसेच झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करणे ही महापालिकेची जबाबदारी असते. यासाठी प्रशासनाकडून उद्यान विभागाला आवश्यक सूचना दिल्या जातात. वाचा सविस्तर
02 Jul 2026 03:30 PM (IST)
पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास दिवसेंदिवस अधिक गती घेत असून, आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्याविरोधात पोलिसांकडून महत्त्वाचे पुरावे गोळा केले जात आहेत. लोहगडावर हत्येचे रिक्रिएशन केल्यानंतर पोलिसांनी सियाला कोंढवा येथील तिच्या राहत्या घरी नेऊन झडती घेतली. घटनेच्या दिवशी तिने परिधान केलेले कपडे, मोबाईल आणि इतर महत्त्वाच्या वस्तू जप्त करण्यात आल्या असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचाही तपास पोलीस करत आहेत. वाचा सविस्तर
02 Jul 2026 03:25 PM (IST)
130th Constitutional Amendment Bill: संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होणार आहे, पण या अधिवेशनापूर्वीच एका विधेयकाच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात आधीच खळबळ उडाली आहे. हे विधेयक म्हणजे १३० वी घटनादुरुस्ती विधेयक, २०२५ होय. यानुसार, गंभीर प्रकरणात अटक झाल्यानंतर ३० दिवस तुरुंगात राहिल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना आपोआप पदावरून दूर करण्याची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २० ऑगस्ट, २०२५ रोजी हे विधेयक लोकसभेत सादर केले होते. पण विरोधी पक्षांकडून तीव्र विरोध आणि गदारोळ झाल्यानंतर, हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे (JPC) पाठवण्यात आले. आता जेपीसी १७ जुलै, २०२६ रोजी आपला अहवाल सादर करणार आहे. वाचा सविस्तर
02 Jul 2026 03:20 PM (IST)
सातारा दि २ ( प्रतिनिधी): राज्य सरकारच्या स्मार्ट मीटर सक्तीच्या निर्णयाविरोधात सातारकरांच्या जनआक्रोश मोर्चाने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जोरदार आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) सातारा जिल्ह्याच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात विविध संघटना, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सरकारविरोधी घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. वाचा सविस्तर
02 Jul 2026 03:15 PM (IST)
जपानच्या पंतप्रधान भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहकार्य वाढवण्यावर चर्चा होणार आहे. गुरुवारी (०२ जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उर्जा सुरक्षेबाबत दोन्ही देशांमध्ये नवीन उपक्रम सुरु करण्यात आला असल्याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, दोन्ही देशात बॅटरी, हरित हायड्रोजन आणि अणुउर्जा क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. स्वच्छ उर्जेला चालना देणे हा याचा उद्देश आहे. भारत आणि जपान आर्थिक सुरक्षेकडे सामायिक सुरक्षा आमि उर्जा क्षेत्रातील बदलांकडे सामायिक संधी म्हणून पाहत आहेत. यासाठी दोन्ही देशांनी 'भारत-जपान नेक्स्ट-जनरेशन मोबिलिटी पार्टनरशिप फ्रेमवर्क' देखील सुरू केले आहे.
#WATCH | Delhi: During press statement with Japanese PM Sanae Takaichi, Prime Minister Narendra Modi says, "... We have also launched a key initiative on energy resilience to tackle situations like oil shocks. Furthermore, our cooperation in batteries, green hydrogen, and nuclear… pic.twitter.com/EJOXId3N54
— ANI (@ANI) July 2, 2026
02 Jul 2026 03:10 PM (IST)
कल्याण: कल्याण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन लहान मुलांसाठी खाऊ आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या 24 वर्षीय महिलेचा रस्त्यावर पडलेल्या उघड्या वीजवाहिनीचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर महावितरणच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, मृत महिलेच्या पतीने तपासादरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याने ‘खर्चा-पाणी’ची मागणी केल्याचा गंभीर आरोप केल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. घडलेली घटना कल्याण पूर्वेतील हनुमान नगर परिसरात घडली. नेमकं काय घडलं?
02 Jul 2026 03:05 PM (IST)
अमेरिका आणि इराणमध्ये कतारची राजधानी दोहा येथे अप्रत्यक्ष चर्चा सुरु आहे. दोन्ही देशांत ६० दिवसांच्या युद्धविरामाच्या अमंलबजावणीवरील चर्चा सकारात्मकपणे सुरु असल्याचे सांगितले जात आहे. या चर्चेत अमेरिकेने इराणची जप्त केलेल्या मालमत्तेवर चर्चा झाली आहे. ही चर्चा यशस्वी झाली असून इराणला ५७ कोटींची जप्त मालमत्ता परत मिळणार असल्याचे इराणने म्हटले. इराणला ५७ कोटींचा निधी परत मिळणार?
02 Jul 2026 02:50 PM (IST)
जागतिक संरक्षण क्षेत्रात आणि भू-राजकीय (Geopolitical) समीकरणांमध्ये भारताने एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक झेप घेतली आहे. भारत आता केवळ जगातील सर्वात मोठा शस्त्र खरेदीदार देश राहिला नसून, तो जगातील सर्वात अत्याधुनिक शस्त्रे निर्यात करणारा महासत्ता बनण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. अत्यंत विश्वासार्ह सूत्रांनी आणि रॉयटर्सच्या वृत्ताने दिलेल्या माहितीनुसार, भारत सध्या संयुक्त अरब अमिरातीला (UAE) आपले जगप्रसिद्ध ‘ब्रह्मोस’ (BrahMos) सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आणि ‘आकाश तीर’ (Akash Teer) स्वयंचलित हवाई संरक्षण प्रणाली निर्यात करण्यासाठी अत्यंत प्रगत पातळीवर वाटाघाटी करत आहे. हा करार अंतिम टप्प्यात असून, यामुळे आखाती देशांमधील (Gulf Region) सुरक्षेची समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत.
02 Jul 2026 02:40 PM (IST)
सध्या फिफा वर्ल्डकप 2026 चा थरार सुरू आहे. आज राऊंड ऑफ 32 च्या बाद फेरीत दोन बलाढ्य संघ आमनेसामने येणार आहेत. कॅनडातील टोरंटो येथील ‘बीएमओ फील्ड’ या स्टेडियमवर युरोपमधील दोन बलाढ्य संघ भिडणार आहेत. पोर्तुगाल आणि क्रोएशिया एकमेकांशी भिडणार आहेत. आज फिफा वर्ल्डकपच्या बाद फेरीत पोर्तुगाल आणि क्रोएशिया एकमेकांशी भिडणार आहेत. आजचा सामना अत्यंत महत्वाचा आसल्याने दोन्ही संघांसाठी करो या मरो अशी स्थिती असणार आहे. या सामन्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आमनेसामने येणारे दोन्ही खेळाडू.
02 Jul 2026 02:26 PM (IST)
खैरानी रोड परिसरातील धक्कादायक घटना, 20 ते 25 फूट खोल मॅनहोलमध्ये माणूस पडला. मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीला वाचवण्याचे प्रयत्न सुरु.
02 Jul 2026 02:25 PM (IST)
करड्या रंगाचे ढग दाटून येताच तहानलेली जमिन पावसांच्या सरीने अगदी ओलिचिंब होऊन जाते. निसर्ग धो-धो पाऊस अंगावर झेलत असताना पर्यटकांना भटकंतीचे वेड लागते. मग अशावेळी निसर्गाच्या सानिध्यात चार सुखाचे क्षण अनुभवण्यासाठी महाराष्ट्रात सहा सर्वोत्तम ठिकाणे आहेत. जून महिन्यात पावसाची चाहुल लागताच सह्याद्रीच्या पर्वतरांगा, दाटून येणारे ढग, घनदाट जंगल पर्यटकांना आकर्षित करतात. तुडुंब भरुन वाहणाऱ्या नद्या, डोंगरमाथ्यावरुन वाहणारे धबधबे, घनदाट जंगलांमध्ये पसरलेली हिरवळ चादर आणि निसर्गाची किमया डोळ्यांना थक्क करते.
02 Jul 2026 02:15 PM (IST)
शिक्षणाचा विचार केला तर कॅनडा नेहमीच भारतीय विद्यार्थ्यांच्या पहिल्या पसंतीमध्ये राहिला आहे. सध्या तेथे ४ लाखांपेक्षा जास्त भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बॅचलर्स, मास्टर्स, पीएचडी आणि डिप्लोमा यांसारखे अनेक कोर्सेस उपलब्ध असण्यासोबतच, शिक्षण पूर्ण झाल्यावर तिथे काम करण्याची संधीही मिळते. मात्र, गेल्या काही काळापासून कॅनडात शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
02 Jul 2026 02:10 PM (IST)
बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नात मानपानात कमी आणि माहेरहून ‘स्कॉर्पिओ’ (Scorpio) गाडी आणण्यासाठी एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर माहेरच्या लोकांनी पैसे देण्यास नकार दिल्याने विवाहितेला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. अखेर या त्रासाला कंटाळून पीडित विवाहितेने पोलिस ठाण्यात धाव घेतली.
02 Jul 2026 02:05 PM (IST)
वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळत नाहीये. कर्णधार श्रेयस अय्यर आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याकडून त्याला भारतीय क्रिकेट संघात आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी दिली जात नाहीये. आयर्लंड मालिकेमध्ये बेंचवर बसून इतर सहकाऱ्यांना पाणी दिल्यानंतर, वैभव सूर्यवंशीच्या चाहत्यांना आणि भारतीय क्रिकेट तज्ज्ञांना वाटले होते की, इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात त्याला संधी दिली जाईल. पण तसे झाले नाही आणि बुधवार, १ जुलै रोजी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी वैभव सूर्यवंशीचा अंतिम ११ खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला नाही.
02 Jul 2026 02:00 PM (IST)
जागतिक संरक्षण क्षेत्रात आणि भू-राजकीय (Geopolitical) समीकरणांमध्ये भारताने एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक झेप घेतली आहे. भारत आता केवळ जगातील सर्वात मोठा शस्त्र खरेदीदार देश राहिला नसून, तो जगातील सर्वात अत्याधुनिक शस्त्रे निर्यात करणारा महासत्ता बनण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. अत्यंत विश्वासार्ह सूत्रांनी आणि रॉयटर्सच्या वृत्ताने दिलेल्या माहितीनुसार, भारत सध्या संयुक्त अरब अमिरातीला (UAE) आपले जगप्रसिद्ध ‘ब्रह्मोस’ (BrahMos) सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आणि ‘आकाश तीर’ (Akash Teer) स्वयंचलित हवाई संरक्षण प्रणाली निर्यात करण्यासाठी अत्यंत प्रगत पातळीवर वाटाघाटी करत आहे. हा करार अंतिम टप्प्यात असून, यामुळे आखाती देशांमधील (Gulf Region) सुरक्षेची समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत.
02 Jul 2026 01:55 PM (IST)
शेतकऱ्यांसाठी शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ जाहीर केली. जिल्ह्यात या योजनेअंतर्गत १ लाख ८० हजार १७६ खातेदार कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास पात्र ठरले असून त्यांचे सगळ्यांचे मिळून १६३२ कोटी १२ लक्ष रुपयांचे कर्जमाफ होणार आहे. अद्याप ७१२ शेतकऱ्यांचे आधार संलग्निकरण प्रलंबित आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील विविध राष्ट्रियकृत, सहकारी बँकामार्फत कर्ज घेतलेल्या खातेदार शेतकऱ्यांपैकी एकूण १ लाख ८० हजार १७६ शेतकरी कर्जमुक्तीस पात्र ठरले आहेत. त्यांची एकूण कर्जमाफीची रक्कम १६३२ कोटी १२ लक्ष रुपये इतकी आहे. आधार संलग्नीकरणानंतर ही आकडेवारी बँकांनी पोर्टलवर अपलोड केलेली आहे.
02 Jul 2026 01:45 PM (IST)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार आणि आधुनिकीकरणाची जबाबदारी जीएमआरकडे सोपवली आहे. या प्रकल्पासाठी विमानतळाच्या कार्यान्वित क्षेत्रातील सुमारे ९०० हेक्टर आणि शहरालगतच्या १०० हेक्टरसह एकूण १,००० हेक्टर जमीन ३० वर्षांसाठी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय विमानतळालगतची २७१ हेक्टर (सुमारे ६७० एकर) अतिरिक्त जमीन व्यावसायिक विकासासाठी वापरण्याची तयारी मिहान इंडिया लिमिटेड (एमआयएल) ने सुरू केली आहे.
02 Jul 2026 01:35 PM (IST)
जागतिक सागरी व्यापाराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या ‘पनामा कालव्या’वरून (Panama Canal) आता दोन जागतिक महासत्तांमध्ये थेट संघर्ष सुरू झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला अत्यंत कडाडून आणि उघड शब्दांत इशारा दिला आहे की, ते चीनला पनामा कालव्याचा ताबा कोणत्याही परिस्थितीत घेऊ देणार नाहीत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पनामा कालव्याचे नियंत्रण स्थानिक पनामा सरकारकडे सोपवण्याच्या जुन्या निर्णयाला अमेरिकेची ऐतिहासिक ‘मोठी चूक’ असे म्हटले आहे. चीन हळूहळू या आंतरराष्ट्रीय जलमार्गावर आपले नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. मात्र, या संपूर्ण वादाच्या आणि आधुनिक अभियांत्रिकीच्या अद्भुत नमुन्याच्या मागे एक असा इतिहास दडला आहे, ज्याचा थेट संबंध भारताशी आणि भारतीय कामगारांच्या अथांग परिश्रमांशी आहे.
02 Jul 2026 01:25 PM (IST)
देशभरात वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट घालणे अनिवार्य केले आहे. रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण लक्षात घेता, मोटार वाहन कायद्यात कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. हेल्मेट न घालता वाहन चालवणाऱ्या चालकांवर तसेच मागे बसलेल्या प्रवाशांवरही दंडात्मक कारवाई केली जाते. अनेक राज्यांमध्ये या नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे.
02 Jul 2026 01:15 PM (IST)
२०२६ मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक असलेला ‘ईठा’ पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित या बायोपिकमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिका साकारत असून, तिच्या मानधनाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
02 Jul 2026 01:02 PM (IST)
भररस्त्यावर सुरू असलेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याची घटना हडपसरमधील मांजरी भागात घडली. पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. याप्रकरणी अक्षय मोहन देशमुख (वय ३१, रा. देशमुख मळा, फुरसुंगी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने मांजरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मांजरी परिसरात (दि. २९ जून) पोलिसांचे पथक सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गस्त घालत होते. त्यावेळी रस्त्यावर भांडणाचा प्रकार सुरू होता. महिला पोलीस कर्मचाऱ्याने भांडणात मध्यस्थी करुन देशमुख याला ताब्यात घेतले. भांडणे करु नका, असे सांगितले. त्यानंतर देशमुखने महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी देशमुख याला अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक अनिल बिनवडे तपास करत आहेत.
02 Jul 2026 12:48 PM (IST)
मुंबईतून महागडी कार चोरून पसार झालेल्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. चोरट्याकडून ३० लाख रुपये किंमतीची कार जप्त करण्यात आली. अनीस अमीर शेख (वय २८, रा. भोंडवे वस्ती, रावेत, पिंपरी-चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मुंबईतील आंबोली परिसरातून महागडी मोटार चोरीला गेली होती. या प्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पसार झालेला चोरटा पुण्यात मोटार घेऊन आला होता. तो मोटार विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथक (एक) मधील पोलीस हवालदार रहीम शेख आणि पोलीस शिपाई मयूर भोकरे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३० लाख रुपये किंमतीचे महागडी मोटार जप्त करण्यात आली. पोलिस निरीक्षक महेश सागडे, सहायक निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, रणजीत फडतरे, रहीम शेख, बाबा दांगडे, सयाजी चव्हाण, अमोल आवाड, अतुल साळवे, बाला रफी शेख, राजेंद्र लांडगे, दुर्योधन गुरव, राजेंद्र लांडगे, नितीन बोराटे, मयूर भोकरे, सुहास जगताप यांनी ही कामगिरी केली.
02 Jul 2026 12:36 PM (IST)
वस्त्र दालनातील पावणेदोन लाख रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावर घडली. याप्रकरणी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३७ वर्षीय व्यक्तीने लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावासायिकाचे वस्त्र दालन महात्मा गांधी रस्त्यावर आहे. मंगळवारी (३० जून) पहाटे चारच्या सुमारास चोरट्यांनी वस्त्र दालनातील पहिल्या मजल्यावर असलेल्या खिडकीची जाळी उचकटून आत प्रवेश केला. नंतर चोरट्यांनी गल्ल्यातील १ लाख ७० हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. रोकड चोरीचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. नंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. अधिक तपास उपनिरीक्षक राहुल घाडगे तपास करत आहेत.
02 Jul 2026 12:24 PM (IST)
मोबाईल चोरत असल्याच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि. ३०) रात्री एक वाजण्याच्या सुमारास चाकण येथील आंबेठाण चौकाजवळील संकल्प हॉटेलजवळ ही घटना घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. गोविंद शिवनारायण ढगे (वय २४, रा. चाकण) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ख्वाजा जमालउद्दीन शेख (वय २३, रा.आंबेठाण चौक, चाकण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश रवी सोनवणे (वय २५) आणि बुद्धभूषण उर्फ मयूर मुकुंद मोकळे (वय २३, दोघे सध्या रा. आंबेठाण चौक, चाकण, मूळ रा. बुलढाणा) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत गोविंद ढगे, फिर्यादी खाजा शेख आणि आरोपी हे चाकण येथील आंबेठाण चौक परिसरात राहतात. मंगळवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास मयत गोविंद हा दारू पिऊन आरोपींच्या खोलीमध्ये आला. तिथे त्याने शिवीगाळ करत मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला. तो मोबाईल चोरत असल्याचा समज करून आरोपी आकाश सोनवणे आणि बुद्धभूषण ऊर्फ मयूर मोकळे यांनी त्याला लाथाबुक्क्या व बॅटने बेदम मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर घरी जाऊन झोपला असता तो बेशुद्ध झाला. फिर्यादी यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांना अटक केली असून चाकण उत्तर पोलीस तपास करत आहेत.
02 Jul 2026 12:12 PM (IST)
दारू पितांना पत्नीला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून झालेला किरकोळ वाद एका मजुराच्या निघृण हत्येपर्यंत जाऊन पोहोचला आहे. कांचनवाडी परिसरातील वुडरीज स्कूललगतच्या मोकळ्या मैदानात तिघा मित्रांनी मिळून राजू किसन वंजारी (वय ३३, रा. गौतमनगर) यांना बेदम मारहाण करत त्यांचे डोके झाडावर आपटले. गंभीर जखमी झालेल्या राजू यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सातारा पोलिसांनी काही तासांत तपास पूर्ण करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे. मूळ नांदेड जिल्ह्यातील राजू वंजारी गेल्या सुमारे २५ वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरात मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन लहान मुले तसेच वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. आई गेल्या दोन वर्षांपासून पक्षाघातामुळे अंथरुणाला खिळून असून पत्नी मोलमजुरी करून संसाराला हातभार लावत आहे. कमावता मुलगा गमावल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कांचनवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
02 Jul 2026 11:55 AM (IST)
सोन्याच्या किमतीतील घसरण सुरूच आहे. सोन्याच्या किमतीत गेल्या १८ वर्षांतील सर्वात मोठी मासिक घसरण नोंदवली गेली आहे. ऑक्टोबर २००८ नंतर प्रथमच अशी मोठी घसरण दिसून आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात COMEX सोन्याच्या किमतीत १ जुलै रोजी पुन्हा घसरण झाली. सोने पुन्हा स्वस्त झाले आहे. आज जागतिक बाजारात सोन्याची किंमत २२ डॉलरपेक्षा जास्त घसरून प्रति औंस ३,९८५ डॉलरवर पोहोचली. यापूर्वी, सोन्याचा भाव प्रति औंस ४,००५.६९ डॉलरवर उघडला होता, परंतु त्यानंतरही घसरण सुरूच राहिली. सोन्याची किंमत ४,००० डॉलरच्या खाली घसरली आहे.
02 Jul 2026 11:45 AM (IST)
व्हॉट्सॲपने नुकतेच सादर केलेल्या ‘यूजरनेम’ फीचरमुळे आता वापरकर्त्यांना मोबाईल नंबर शेअर न करताही इतरांशी संवाद साधता येणार आहे. मात्र, या नव्या सुविधेच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारने सावध भूमिका घेतली असून, व्हॉट्सॲपची मूळ कंपनी मेटाला नोटीस बजावण्यात आली आहे. केंद्र सरकारने मेटाला व्हॉट्सॲपच्या ‘यूजरनेम’ फीचरबाबत तीन दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, या विषयावर सरकारसोबत चर्चा आणि सल्लामसलत पूर्ण होईपर्यंत भारतात हे फीचर रोलआउट करू नये, असेही सांगण्यात आले आहे.
02 Jul 2026 11:35 AM (IST)
शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्यानंतर राज्यात ऑपरेशन तुतारीच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच खासदार अमोल कोल्हे यांच्या एका वक्तव्यावरुन सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे इन्फ्रामॅन म्हणून कौतुक केलं आहे. त्यांच्या या कौतुकानंतर सत्ताधारी पक्षाकडून ऑफर आली आहे का, असा सवाल त्यांना पत्रकारांनी विचारला असता, ” मला अजून ऑफर आलेली नाही, पण आल्यास विचार करू,” असं सूचक विधान अमोल कोल्हे यांनी केलं आहे.
02 Jul 2026 11:25 AM (IST)
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून त्याचा फटका सर्वसामान्यांसह मनोरंजन विश्वातील कलाकारांनाही बसत आहे. अभिनेत्री अशनूर कौर हिच्या घरातही पावसाचे पाणी शिरल्याची घटना समोर आली आहे. अभिनेत्रीने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ शेअर करत घरातील परिस्थिती दाखवली आहे.
02 Jul 2026 11:15 AM (IST)
दिवंगत रतन टाटा यांचे सर्वात विश्वासू सहकारी आणि ज्येष्ठ कार्यकारी अधिकारी, मेहली मिस्त्री यांनी टाटा ग्रुपची कंपनी असलेल्या RNT Associates प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. मेहली मिस्त्री हे शापूरजी मिस्त्री आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष दिवंगत सायरस मिस्त्री यांचे चुलत भाऊ आहेत. तथापि, टाटा ट्रस्ट्सनंतर टाटा सन्समध्ये दुसरा सर्वात मोठा भागधारक असलेल्या शापूरजी पालोनजी ग्रुपशी त्यांचा आता कोणताही संबंध राहिलेला नाही.
02 Jul 2026 11:07 AM (IST)
भोपाळमधील माजी न्यायाधीश गिरिबाला सिंह यांच्या घरी चोरी झाली असून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. गरिबाला सिंह आणि समर्थ कारागृहात असल्याने त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजेरी लावली.
02 Jul 2026 11:00 AM (IST)
कालपासून इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील 5 टी 20 सामन्यांच्या सिरिजला सुरुवात झाली आहे. मात्र कालचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 189 रन्स केल्या. मात्र इंग्लंडच्या संघाला खेळण्याची संधीच मिळाली नाही. मात्र कालच्या सामन्यात इशान किशन अन् अभिषेक शर्मामधील संवाद व्हायरल झाला आहे. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे
02 Jul 2026 10:50 AM (IST)
पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे या प्रकरणातील धक्कादायक कंगोरे समोर येत आहेत. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेमागे नियोजनबद्ध कट असल्याचा पोलिसांचा संशय असून, आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या नात्याबाबतही नवनवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान, चेतनच्या जोधपूरमधील मित्रांनी केलेल्या दाव्यांमुळे या प्रकरणातील राजस्थान कनेक्शन चर्चेत आले आहे.
02 Jul 2026 10:40 AM (IST)
जर तुम्ही सिव्हिल किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये बी.टेक. पूर्ण केले असेल आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असेल, तसेच तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही भरती तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने ‘कन्सल्टंट साईट इंजिनिअर’ पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार २० जुलै २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
02 Jul 2026 10:30 AM (IST)
अयोध्या येथील राम मंदिरातील दान चोरीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांकडून सरकारवर सातत्याने तिखट शब्दांत हल्ले केले जात आहेत. समाजवादी पक्षाचे सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी मोठा आणि खळबळजनक आरोप केला आहे. ते म्हणाले की, ही देणगी चोरी म्हणजे एक अतिशय मोठा घोटाळा असून, हे संपूर्ण प्रकरण सुमारे २० हजार कोटी रुपयांचे आहे. यामध्ये अनेक बड्या लोकांचा समावेश असल्याचा आरोप त्यांनी केला.






