सीतामढी : प्रेम (Love Is Blind) आंधळं असतं. असं ज्याने कुणी म्हटलं ते बरोबरच म्हण्टलंय. जो प्रेमाच्या सागरात बुडतो तो किती खोलवर गेला हे कळत नाही. त्याला फक्त प्रेमाच्या सागरात खोलवर बुडून जायचे असते. प्रेम काय असते, त्याची उत्कटता कशी असते हे जाणून घ्यायचे असेल आणि समजून घ्यायचे असेल, तर बिहार (Bihar) आणि महाराष्ट्राची (Maharashtra) ही लव्हस्टोरी (Love story) वाचाचं.
[read_also content=”लग्नानंतर संबंध ठेवण्यास वधूची टाळटाळ, संतापलेल्या वराने केलं असं काही…मात्र, सत्य समोर येताच बसला जबर धक्का https://www.navarashtra.com/crime/the-bride-did-not-make-relations-for-many-days-after-the-marriage-groom-forcibly-touched-her-then-the-truth-shocked-the-groom-nrps-424143.html”]
आपलं प्रेम मिळवण्यासाठी महाराष्ट्रातून थेट बिहारच्या भूमीत पोहोचलेल्या शिवाची ही कहाणी आहे. तिच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या तरुणाचे प्रेम मिळवण्यासाठी शिवाने सर्व काही सोडले आणि सीतामढी गाठले. आणि तिला तिचं प्रेम मिळेपर्यंत ती तिथेचं राहिली. अखेर तिला तिचं प्रेम मिळालं.
या लव्हस्टोरीतील महिलेचे वय सुमारे 50 वर्षे, तर तरुणाचं वय अवघं 25 वर्ष आहे. शिवा असं महिलेचं नाव आहे. ती पुणे येथील रहिवासी आहे. तर, तौकीर हा बिहारच्या बेडोल गावात राहतो. सुरुवातीला दोघांमध्ये सुरू झालेलं आकर्षण प्रेमापर्यंत पोहोचलं.मात्र, वास्तविकता लक्षात आल्यावर तौकीर वयाच्या अंतराच कारण देत तिच्यापासून दूर जाऊ लागला. मात्र हा धक्का सहन न झाल्यानं प्रेमात वेड लागलेल्या शिवाने प्रियकराला मिळवण्यासाठी पती आणि मुलांना सोडून थेट सीतामढी येथील पुपरी जाण्याचा निर्णय घेतला. आठवडाभर चाललेल्या या हायव्होल्टेज ड्रामानंतर सोमवारी या प्रकरणावर पडदा पडला.
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांची कसरत सुरू होती. शिवा ही महिला त्याच्या आईच्या वयाची असल्याचे तौकीर वारंवार पोलिसांना सांगत होता आणि आपल्याला हे नातं नको असल्याचंही सांगत होता. महिलेने त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं असल्याचंही तो म्हणत होता. मात्र, हे ऐकल्यानंतर शिवाने पोलीस स्टेशनमध्ये चांगलाच राडा केला. प्रेमाला वयाची मर्यादा नसते. तिने तौकीरला पती म्हणून स्वीकारले आहे. वर्षभरापासून ते पती-पत्नी म्हणून राहत होते. तिला कशाचीही गरज नाही, फक्त तौकीर हवा आहे असं ती पोलिसांना सांगत होती. या संपूर्ण प्रकरणात मात्र पोलिसांच्या डोक्याला चांगलाच ताप झाला.
शिवा ही पुण्यातील एका खासगी नर्सिंग होममध्ये परिचारिका म्हणून काम करत असल्याचं तिने सांगितलं. तर तौकीरला अंमली पदार्थांचे व्यसन असल्याची तिने पोलिसांना माहिती दिली. तिने त्याला एक चांगला माणूस बनवल्याचंही तिने सांगितलं. दुसरीकडे, तौकीरच्या कुटुंबाने शिवाला स्विकारण्यास नकार दिला होता. मात्र, शिवाने तौकीरला मिळवण्याची शपथ घेतली होती. त्यामुळे तिने हार मानली नाही आणि तौकीरला समजवण्याचे तिचे प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर तिच्या प्रयत्नांना यश आलं. तौकीर आणि त्याच्या कुटुंबाने शिवाला स्विकारलं असून पोलिसांना दिलेली तक्रारही मागे घेतली आहे. पोलिसांनी बाँड भरल्यानंतर तौकीरची सुटकाही केली. तौकीर शिवाला सोबत घेऊन घरी गेला.