आज आणखी ७ उड्डाणे रद्द, अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियासोबत नक्की काय घडतंय?
अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाची स्थिती सतत बिकट होत चालली आहे. उड्डाणे सतत रद्द केली जात आहेत. आज, १७ जून रोजी ७ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. एअर इंडियाने लंडन-अमृतसर, दिल्ली-दुबई, बंगळुरू-लंडन, मुंबई-सॅन फ्रान्सिस्को, दिल्ली-पॅरिस, दिल्ली-दुबई आणि दिल्ली-व्हिएन्ना फ्लाईट रद्द करण्या आल्या असून ही सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणं आहेत. अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियासह सर्वच एअरलाईन्सकडून सतर्कता बाळगली जात आहे.
AI915 – दिल्ली ते दुबई – B788 ड्रीमलायनर
AI153 – दिल्ली ते व्हिएन्ना – B788 ड्रीमलायनर
AI143 – दिल्ली ते पॅरिस – B788 ड्रीमलायनर
AI159 – अहमदाबाद ते लंडन – B788 ड्रीमलायनर
AI170 – लंडन ते अमृतसर – B788 ड्रीमलायनर
AI133 – बेंगळुरू ते लंडन – B788 ड्रीमलायनर
AI179 – मुंबई ते सॅन फ्रान्सिस्को – B777
अहमदाबाद ते लंडनच्या गॅटविक विमानतळावर जाणारी एअर इंडियाची फ्लाइट AI159 विमानांच्या अनुपलब्धतेमुळे रद्द करण्यात आली. विमान दुपारी 3 वाजता सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेणार होते. एअरस्पेस निर्बंध आणि अतिरिक्त खबरदारीच्या तपासणीमुळे विमान उपलब्ध नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.
त्याच वेळी, तांत्रिक बिघाडामुळे दिल्ली ते पॅरिसचे फ्लाइट AI143 रद्द करण्यात आले. लंडन (गॅटविक) ते अमृतसर हे फ्लाइट AI170 रद्द करण्यात आले आहे. कंपनीने म्हटले आहे की इस्रायलशी झालेल्या युद्धामुळे इराणने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे, ज्यामुळे युरोपला जाणाऱ्या विमान उड्डाणांवर परिणाम होत आहे. याशिवाय, इतर अनेक उड्डाणे देखील रद्द करण्यात आली आहेत. जवळजवळ सर्वच कारण एकच आहे.
कंपनीने म्हटले आहे की आमच्या प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला दिलगीर आहोत आणि आम्ही त्यांच्या गंतव्यस्थानावर जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. आम्ही हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करत आहोत आणि प्रवास रद्द केल्यास पूर्ण परतफेड किंवा वेळापत्रक बदलण्याची ऑफर दिली आहे. कंपनीने असेही म्हटले आहे की प्रवाशांना शक्य तितक्या लवकर त्यांच्या गंतव्यस्थानावर नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था करत आहे.






