भयमुक्त आणि निष्पक्ष निवडणूक होण्यासाठी कॉँग्रेसकडून 'Eagle' टीमची स्थापना (फोटो- टीम नवराष्ट्र/सोशल मिडिया)
नवी दिल्ली: सध्या दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. त्यातच लवकरच बिहारची निवडणूक देखील होणार आहे. दरम्यान देशात यापुढे होणाऱ्या निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी कॉँग्रेस पक्षाने एक मोठे पाऊल उचलले आहे. देशातील निवडणुका भयमुक्त वातावरणात होण्यासाठी आणि निष्पक्ष होण्यासाठी कॉँग्रेसकडून ‘Egale’ टीमची स्थापना केली आहे. यात नियुक्ती करण्यात आले सदस्य हे प्रथम महाराष्ट्राच्या निवडणुकीवर काम करत्नर आहे. ‘ईगल’चा अर्थ आणि यातील सदस्य कशाप्रकारे काम करणार हे जाणून घेऊयात.
कॉँग्रेसने ‘ईगल’ (Empowered Action Group of Leaders and Experts) टीमची स्थापना केली आहे. ही टीम निवडणूकनिहाय आलेले निकाल आणि मतदार यादी यांचे विश्लेषण करणार आहे. याबाबतचा एक अहवाल ही कमिटी हायकमांडकडे सादर करणार आहे. या टीमला पहिले काम हे महाराष्ट्रामधले देण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या मतदार यादीतील फेरफार याबद्दल कमिटी हायकमांडला रिपोर्ट सादर करणार आहेत.
याबाबत कॉँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणूगोपाल यांनी पत्रक काढले आहे. ईगल टीममध्ये 8 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये समावेश करण्यात आलेले सदस्य कोण आहेत. त्यांची नावे जाणून घेऊयात.
हेही वाचा: दारुण पराभवानंतर काँग्रेसची निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती; ‘हे’ 10 रोखठोक सवाल केले उपस्थित
1. अजय माकन
2. दीग्विजय सिंह
3. अभिषेक सिंघवी
4. प्रवीण चक्रवर्ती
5. पवन खेडा
6. गुरदीप सप्पल
7. नितीन राऊत
8. चल्ला रेड्डी
नाना पटोले म्हणाले की, दिल्लीतील काही काँग्रेस नेते २५ जानेवारी रोजी महाराष्ट्रात येऊन माध्यमांशी संवाद साधतील. ते म्हणाले, “लोकसभा निवडणुकीच्या 6 महिन्यांत मतदारांची संख्या 50 लाखांनी कशी वाढली आणि मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजल्यानंतर अचानक 76 लाख मते कशी वाढली? पारदर्शकतेच्या मागण्या असूनही, निवडणूक आयोगाने कोणताही डेटा प्रदान केला नाही. आता, सामान्य माणसाला मतदानाची माहिती देण्यास मनाई करणारे विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी (MVA) ला मोठा धक्का बसला, ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उत्तर प्रदेश) ने 20 जागा जिंकल्या, काँग्रेसने 16 जागा जिंकल्या आणि शरद पवार- राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) ने 16जागा जिंकल्या. फक्त 10 जागा मिळाल्या.
काँग्रेसची निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती