दिल्लीतील ९ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणावरून अरविंद केजरीवाल यांचा मोदी सरकारवर निशाणा साधला (फोटो सौजन्य - एक्स)
नवी दिल्ली : दिल्लीत नऊ वर्षांच्या चिमुरड्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला. यावर आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संताप व्यक्त केला आहे. लेंगिक अत्याचार आणि हत्येवरून दिल्लीतील लोकांमध्ये संताप आहे. राजधानीत घडलेल्या या क्रूरतेवरून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांचे चार इंजिन असलेले सरकार सत्तेत आले तरी मुली सुरक्षित नाहीत, अशा शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा रोष व्यक्त केला आहे.
दिल्लीत ९ वर्षांच्या निष्पाप मुलीवर लैंगिक अत्याचार झाला. आणि या मुलीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण दिल्ली हादरली आहे. अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत की भाजपने दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवली आहे. आजकाल मुली घराबाहेर पडायला घाबरतात. भाजप सरकार प्रत्येक पावलावर अपयशी ठरत आहे.भाजप सरकारच्या राजवटीत कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक उरलेला नाही, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
चार इंजिन सरकारने उत्तर द्यावे
आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, “दिल्लीत गुन्हेगारी कमी होत नाहीये. भाजपकडे डबल इंजिन किंवा फोर इंजिन सरकार असले तरी, त्यांच्या कार्यकाळात मुली सुरक्षित नाहीत. त्यांच्या राजवटीत फक्त गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराची अपेक्षा केली जाऊ शकते. ते म्हणतात की गुन्ह्यांबाबत त्यांचे शून्य सहनशीलतेचे धोरण आहे परंतु त्यांच्या कारकिर्दीतच गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळते. गुन्हेगार गुन्हा करतो आणि पळून जातो आणि पोलिस झोपलेले असतात,” अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, “दिल्लीतील ९ वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार आणि हत्येच्या मुद्द्यावरून अरविंद केजरीवाल यांनी भाजप सरकारला घेरले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधत त्यांनी म्हटले आहे की, भाजपच्या चार इंजिन असलेल्या सरकारला उत्तर द्यावे लागेल. दिल्लीच्या मुलींना न्याय हवा आहे,” अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दिल्लीतील नेहरू बिहार येथे निदर्शने
दिल्लीतील नेहरू विहारमध्ये ९ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या झाल्यानंतर लोक संतप्त झाले होते. या घटनेच्या विरोधात स्थानिक लोकांनी कुटुंबातील सदस्यांसह रस्ता रोखून निषेध करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी कसेतरी समजावून परिस्थिती शांत केली. आरोपीला अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.