बिहारमध्ये उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान (फोटो- सोशल मिडिया)
बिहारमध्ये उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान
122 विधानसभेच्या जागांसाठी मतदान
14 नोव्हेंबरला जाहीर होणार निकाल
Bihar Assembly Election: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी उद्या दुसऱ्या म्हणजेच अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. उद्या 20 जिल्ह्यांमधील 122 जागांसाठी मतदान होणार आहे. तर 14 नोव्हेंबरला बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या दिवशी बिहारमध्ये कोणाची सत्ता येणार हे समजणार आहे. उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान होणार आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचाराची सांगता काल झाली आहे. उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 121 जागांसाठी मतदान पार पडले आहे. पहिल्या टप्प्यात 65 टक्के मतदान झाल्याचे पाहायला मिळाले. अखेरच्या टप्प्यात 1302 उमेदवार आपले नशीब आजमवणार आहेत.
अखेरच्या टप्प्यात 122 जागांसाठी मतदान होणार आहे. उद्या तब्बल 1302 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तब्बल 3 कोटी 70 लाखांपेक्षा जास्त मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. उद्या होणाऱ्या अखेरच्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेत सीमांचल, चंपारण आणि मगध विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
उद्या 122 जागांसाठी मतदान होणार आहे. 101 उमेदवार जनरल, तर 19 उमेदवार अनुसूचित जाती तर 2 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव असणार आहेत. उद्या किती टक्के मतदान होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. बिहारमध्ये कोणाची सत्ता येणार आणि कॉन विरोधी पक्षात राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मतदानाचा डेटा निवडणूक आयोगापर्यंत लवकर कसा पोहोचतो?
देशात गेल्या काही वर्षांपासून ईव्हीएम मशीनद्वारे मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. पण ईव्हीएम मशीन इंटरनेटशी जोडलेली नसताना, निवडणूक आयोगाला दर दोन तासांनी मतदानाची अद्ययावत टक्केवारी कशी कळते? असा प्रश्न उपस्थित केला जातो. “या विशिष्ट मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत एवढ्या टक्के मतदान झाले” अशी माहिती आयोगाला इतक्या कमी वेळेत कशी मिळते आणि काही क्षणांतच ती व्होटर टर्नआउट अॅपवर कशी दिसते, याबद्दल उत्सुकता व्यक्त होत आहे.
या प्रक्रियेचा मागोवा घेण्यासाठी एका वृत्तवाहिनीने निवडणूक अधिकारी हिमांशू शुक्ला यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले की प्रत्येक मतदान केंद्रावरून मतदानाच्या टक्केवारीचा डेटा ठराविक वेळेनंतर स्थानिक पातळीवर नियुक्त केलेल्या प्रेक्षक आणि सहाय्यक अधिकाऱ्यांमार्फत संकलित केला जातो. नंतर हा डेटा एसएमएस, मोबाईल अॅप किंवा सुरक्षित डिजिटल माध्यमांद्वारे जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे पाठवला जातो. तेथून तो थेट राज्य निवडणूक नियंत्रण केंद्रात पोहोचतो आणि काही क्षणातच तो व्होटर टर्नआउट अॅपवर अपडेट होतो. या प्रणालीमुळे मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगवान बनली असून, नागरिकांना वेळोवेळी मतदानाच्या स्थितीबाबत अचूक माहिती मिळू शकते.






