नवी दिल्ली – मला टार्गेट करण्यासाठी भाजपा अण्णा हजारेंचा वापर करत आहे, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. अण्णा हजारेंनी आज अरविंद केजरीवाल यांना नव्या दारु धोरणावरुन पत्र लिहित टीका केली होती. त्यावर केजरीवालांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले होते अण्णा हजारे
अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी आम आदमी पक्षाचे (Aap) नेते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना पत्र लिहिले आहे. दिल्लीतील अबकारी धोरणात (Liquor Policy) कथित घोटाळ्याच्या आरोपांना सामोरे जात आहेत. या पत्रात अण्णांनी दारूशी संबंधित समस्या आणि त्यावरील सूचना दिल्या आहेत. पत्रात अण्णा हजारे यांनी लिहिले की स्वराज (Swaraj) नावाच्या पुस्तकात तुम्ही किती आदर्श गोष्टी लिहिल्या होत्या. तेव्हा तुमच्याकडून खूप अपेक्षा होत्या. पण राजकारणात गेल्यावर आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर, तुम्ही विसरलात असे दिसते.