नाशिकमध्ये भाजपचा १०० पारचा नारा..: काँग्रेसही स्वबळावर निव़डणुकीच्या मैदानात
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. नाशिकमध्य होणाऱ् सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षआणि महानगरपालिकेवर सत्ता स्थापनकरण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. विशेष म्हणजे भाजपने यावेळी थेट 100 पारचा नारा दिला आहे, महायुतीनंतर आता महाविकास आघाडीतील कॉंग्रेस नही शहरात स्वबळाचा नारा दिला आहे.
यासंदर्भात बोलताना अकाँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी प्रतिक्रीया दिली आहे. कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याने या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. त्यासाठी पक्षश्रेष्ठींना भेटून उमेदवारांची चाचपणी पूर्ण झाल्याच अहवालही सादर करण्यात आला आहे. यावेळी काँग्रेस महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे छाजेड यांनी सांगितले आहे. पण काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असला तरी त्यावर शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार यांचा गट काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
छाजेड म्हणाले ”आगामी महानगरपालका निवडणुकीत काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे. ही निवडणूक पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची आहे. या निवडणुकीत सर्व पक्षांच्या निष्ठावान कार्यकर्त्यंना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणुकीकरता तयार असून पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील तो काँग्रेसचे कार्यकर्ते निष्ठेने पाळतील, असही आकाश छाजेड यांनी सांगितलं आहे.
Karnatak Crime: विवाहित प्रेयसीच्या तोंडात टाकले ज्वलनशील पदार्थ, नंतर केली निर्घृण हत्या
नाशिकमध्ये लवकरच प्रभाग निहाय बैठका घेऊन इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील. अर्ज छाननी समिती कोणत्याही निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेईल, असा विश्वास ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास सातभाई यांनी व्यक्त केला. तर, लोकांमध्ये काँग्रेसचा विचार रुजला आहे. कुठल्याही अफवा किंवा इतर कोणत्याही गोष्टींवर विश्वास न ठेवता काँग्रेसचे सर्व उमेदवार निवडणूक लढवणार आहेत आणि काँग्रेसशिवाय कोणी सत्ता स्थापन करणार नाही, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव राहुल दिवे यांनी व्यक्त केला आहे. तर प्रदेश काँग्रेसचे सचिव ज्ञानेश्वर गायकवाड म्हणाले की, देशामध्ये परिवर्तनाची लाट असून नाशिक शहर यात मागे राहणार नाही. कार्यकर्त्यांनी लोकांच्या रोजच्या समस्यांकडे, अडचणींकडे लक्ष द्यायचे आहे. निवडणुकीमध्ये जनता आपल्याबरोबर राहील यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत.