झारखंडमध्ये बस-ट्रकचा भीषण अपघात (फोटो- सोशल मीडिया)
देवघर: झारखंडच्या देवघरमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या भयानक अपघातात १८ भाविकांचा मृत्यू झाला आहे. झारखंडच्या देवघरमध्ये हा भीषण अपघात घडला आहे. देवघर-बासुकीनाथ मार्गावर हा भीषण अपघात घडला. बस णित्रकही धडक इतकी जोरदार होती की, त्यात बसचा चक्काचूर झाला आहे. सकाळी सव्वा सातच्या सुमारास बिहारमधून भाविकांना घेऊन एक बस झारखंडच्या दिशेने येणाऱ्या एक बसची आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती, की बसचा चक्कचुर झाला आहे.
या भीषण अपघातामध्ये १८ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बचावकार्य सुरु करण्यात आले. या अपघातामध्ये १८ भाविकांचा अंत झाला आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट देखील शेअर केली आहे.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
झारखंडच्या देवघरमध्ये झालेला अपघात वेदनादायी आहे. या अपघातामध्ये ज्या भाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे, त्यांच्या प्रती आणि कुटुंबियांच्या प्रती मी संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांना दुःख सहन करण्याची शक्ती देवो. जखमी झालेले लवकरात लवकर बरे होवोत अशी मी प्रार्थना करतो.
झारखंड के देवघर में हुई सड़क दुर्घटना अत्यंत दुखद है। इसमें जिन श्रद्धालुओं को अपनी जान गंवानी पड़ी है, उनके परिजनों के प्रति मेरी गहरी शोक-संवेदनाएं। ईश्वर उन्हें इस पीड़ा को सहने की शक्ति दे। इसके साथ ही मैं सभी घायलों के जल्द से जल्द स्वस्थ होने की कामना करता हूं: PM…
— PMO India (@PMOIndia) July 29, 2025
सध्या श्रावण महिना सुरु आहे. मोठ्या संख्येने भाविक लाखो भाविक झारखंडच्या प्रसिद्ध बाबा बैद्यनाथ धाम येथे दर्शनासाठी येत असतात. डेव्हगर या ठिकाणी येणारे भाविक बासुकीनाथ येथे देखील दर्शनाला जात असतात. त्यामुळे या मार्गावर काहीशी गर्दी पाहायला मिळते.
वेगाने बचावकार्य सुरु
या भीषण अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. सर्वात प्रथम जखमी भाविकांना बाहेर काढण्यात आले. तातडीने त्यांना उपचारांसाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हे सर्व भाविक बिहारमधील रहिवासी असल्याचे समजते आहे. दरम्यान आहे अपघात नेमका कशामुळे घडला, यामध्ये चूक कोणाची होती? याबाबत पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे.
खासदार निशिकांत दुबे काय म्हणाले?
खासदार निशिकांत दुबे यांनी देवघर येथील अपघाताची पुष्टी केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत ते म्हणाले, “माझ्या लोकसभा मतदारसंघातील देवघर येथे बस आणि ट्रकचा अपघात झाल्याने १८ भाविकांचा मृत्यू झाला आहे. बाबा बैद्यनाथ त्यांच्या कटुंबीयांना दुःख सहन करण्याची शक्ती देवो.