भूषण गवई यांच्या विधानाने वाद पेटला (फोटो- टीम नवराष्ट्र)
1. सरन्यायाधीश भूषण गवई सापडले वादाच्या भोवऱ्यात
2. मध्यप्रदेशमधील जवारी मंदिरातील भगवान विष्णूंच्या मूर्तीवरून केले होते विधान
3. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिले स्पष्टीकरण
4. सोशल मिडियावर गवई यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले.
CJI Of India: भूषण गवई हे भारताचे सरन्यायाधीश आहेत. मात्र सध्या एका विधानामुळे भूषण गवई हे चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी मध्यप्रदेश मधील खजूराहो येथील एका मंदिरातील भगवान विष्णू यांच्याबाबत केलेले विधान चांगलेच चर्चेत आले आहे. या विधानाने वाद पेटला आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांनीय सोशल मिडियावर ट्रोल केले जात आहे.
भूषण गवई यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या असे म्हटले जात आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मध्यप्रदेशच्या खजूराहो येथील प्रसिद्ध जवारी मंदिरातील भगवान विष्णूंच्या मूर्तीबद्दल केलेल्या विधानाने वाद पेटला आहे. यावर आता सरन्यायाधीश भूषण गवई यांनी स्पष्टीकरण दिल्याचे समोर आले आहे. मात्र आधी हे प्रकरण नेमके काय आहे, हे जनऊन घेऊयात.
नेमके प्रकरण काय?
मध्यप्रदेशमधील खजूराहो येथील जवारी या मंदिरातील भगवान विष्णू यांच्या मूर्तीबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. तेथील खंडित मूर्ती दुरुस्त करण्याबाबत ही याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेवर सुनावणी करताना भूषण गवई यांनी एक विधान केले होते. त्यावरून सोशल मिडियावर एकच गदारोळ उडाला आहे. सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली होती.
CJI Bhushan Gawai: “आता खंडपीठ उभारणीसाठी…”; CJI भूषण गवई यांचे कोल्हापुरात प्रतिपादन
काय म्हणाले होते सरन्यायाधीश भूषण गवई?
याचिकेवर सुनावणी करताना भूषण गवई म्हणाले, “तुम्ही जर खरे विष्णूभक्त असाल तर ध्यान करा. प्रार्थना करा. देवालाच काय करायचे ते विचारा.” या विधानाने सोशल मिडियावर वाद पेटला. सरन्यायाधीश भूषण गवई यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले.आमच्या श्रद्धेची खिल्ली उडवली गेली असे म्हणण्यात आल्याचे समोर आले. विश्व हिंदू परिषदेने देखील याबाबत भाष्य केले आहे.
सरन्यायाधीश भूषण गवई यांचे स्पष्टीकरण काय?
मी सर्व धर्मांचा आदर करतो. हे प्रकरण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अंतर्गत होते. याच्याशी ते प्रकरण संबंधित होते. माझे वक्तव्य सोशल मिडियावर चुकीच्या पद्धतीने दाखवले गेले. माझे वक्तव्य सोशल मिडियावर चुकीच्या पद्धतीने दाखवले गेले असे कोणीतरी मला सांगितले, असे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सांगितले.