SIR विरोधातील याचिकांवर सरन्यायाधीश सूर्यकांत नाराजी व्यक्त करत पब्लिसिटी संस्ट असल्याचे म्हटले (फोटो - सोशल मीडिया)
SIR विरोधाच्या सततच्या ओघावर नाराजी व्यक्त करताना सीजेआय म्हणाले की हे सर्व प्रसिद्धीसाठी आणि पब्लिसिटीसाठी केले जात आहे. आपल्याला केवळ एसआयआर सारख्या मोठ्या प्रकरणांवरच नव्हे तर सामान्य लोकांशी संबंधित प्रकरणांवरही लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. यावेळी एक उदाहरण देताना ते म्हणाले, “रेल्वे अपघाताचे प्रकरण पहा… एका व्यक्तीचा रुळांवर मृत्यू झाला… आम्ही काही भरपाई दिली पण वारसांना काहीही मिळाले नाही. भरपाई न मिळाल्याने ते गायब झाले. आता आम्ही त्यांना शोधून काढले आहे आणि त्यांना पैसे मिळतील याची खात्री केली आहे… त्या विधवेच्या चेहऱ्यावरील हास्याची कल्पना करा?” असे वास्तव सरन्यायाधीशांनी न्यायालयामध्ये मांडले.
हे देखील वाचा : तीन वेळा मतदान केलं नाही तर मतदारयादीतून नाव बेदखल…; संसदेमधील मागणीने उडाली खळबळ
मला सुनावणींसाठी समान वेळ हवी
दरम्यान, सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, “आता, बार सदस्यांना प्रत्येक बाबींसाठी एक वेळ निश्चित करावी लागेल कारण काही तातडीच्या बाबी न्यायालयाचा सर्व वेळ घेतात आणि अनेक बाबींमध्ये, विशेषतः MACT बाबींमध्ये, याचिकाकर्त्यांना वेळ मिळत नाही.” ते पुढे म्हणाले, “मला या न्यायालयात सर्व बाबींसाठी समान वेळ वाटप हवा आहे. SIR सारख्या तातडीच्या बाबी संपूर्ण दिवस घेतात. भरपाईच्या बाबींसाठी येणारे याचिकाकर्ते शेवटच्या रांगेत बसतात आणि संध्याकाळी ४ वाजता सुनावणीशिवाय घरी जातात, त्यांना त्यांची पाळी कधी येईल हे माहित नसते.ते निराश होऊन घरी जातात. त्यांना देखील सुनावणीसाठी वेळ दिला पाहिजे, ” अशा शब्दांत न्यायालयातील प्रलंबित याचिका आणि सुनावणीसाठी न मिळणारा वेळ या गोष्टी बोलून दाखवल्या आहेत.
हे देखील वाचा : IndiGo चं उड्डाण रद्द झालं तर मिळणार 10,000 रुपये, इंडिगोची मोठी घोषणा






