CJP Protest Update: पोलिसांच्या वर्दीत गुंड, भर रस्त्यात अभिजीत-आशुतोष पोलिसांना भिडले
CJP Protest Update: दिल्लीतील संसद भवन परिसरात घडलेल्या घडामोडीनंतर संपूर्ण देशातील वातावरण चांगलचं तापलं आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्यानंतर कॉकरोज जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके, प्रवक्ता सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट दिल्ली पोलिसां समोर उभे ठाकल्याचे पाहायला मिळाले. दिल्ली पोलिसांनी त्यांना संसद भवन मार्गावरील पोलिस ठाण्यात जाण्याची सुचना केली. पण अभिजीत यांनी तिथे जाण्यास नकार दिला.
पोलिसांनी तीघांनाही पोलीस ठाण्यात जाऊन चर्चा करण्याची विनंती केली.पण तिघेही चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांना पोलिसांनी खूप मारल आहेत. आम्ही तुमच्या लाठ्या काठ्या खाल्या आहेत. तुम्ही विद्यार्थ्य़ांना खूप मारलं आहे. आता आम्हाला इथे रस्त्यावरच बोलायचं आहे. तुम्ही किती मारहाण केली. अजूनही तुमच मन भरलं नाही का, १२ वर्षांच्या मुलीचं डोक फोडलं, अशा शब्दांत अभिजीत यांनी पोलिसांना सुनावलं.
विद्यार्थ्यांनी काल तुमचा मार खाल्ला, आता सकाळीही तुम्ही विद्यार्थ्यांना मारहाण करत आहात, तुमचं मन भरलं नाही का, तुम्ही विद्यार्थ्यांचे रक्त सांडलं आहे. आता बसून चर्चा होणार नाही. तुम्ही काल रस्त्यावर पोरांना मारलं आहे. आताही तुम्ही जंतर मंतरवर येणारे-जाणारे रस्ते बंद केले आहेत. पोलिसांनी आम्ही जंतर मंतरवरील रस्ते खुले करत असल्याचे आश्वासन दिले.
कालच्या घटनेनंतर बोलताना अभिजीत दिपके म्हणाले, कालच्या घटनेनंतर देशात पोलीस नाहीत पोलिसांची गुंडगिरी सुरू आहे. पुरुष पोलिसांनी सोनम वांगचुक यांच्या पत्नी गितांजली वांगचुक यांच्या केसांना धरून ओढले. नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांनी या देशात पोलिसांना गुंड बनवून ठेवलं आहे. २० हून अधिक विद्यार्थ्यांची हत्या करून मन भरलेल नाही. म्हणूनच त्यांनी आज पोलिसांना अजून विद्यार्थ्यांना निर्दयीपणे मारहाण करण्याचे आदेश दिले होते.
काल दिल्ली पोलिसांच्या वर्दीत गुंड भरले होते. नावाची प्लेट हटवून त्यांनी मुलांना मारहाण केली आहे. काय चाललंय हे देशात १२ वर्षांच्या मुलीला तुम्ही मारत आहात, यांना शरम वाटत नाहीत. काल सोनम वांगचुक त्यांचे उपोषण सोडणार होते, खूप मुश्कीलिने आम्ही त्यांना उपोषण सोडण्यासाठी तयार केलं होतं. पण संसद भवन परिसरात काल झालेल्या घटनेनंतर त्यांनी उपोषण सोडण्यास नकार दिला आहे. अजून एक दिवस जरी त्यांनी उपोषण सुरू ठेवलं तरी त्यांच्या आरोग्यासाठी घातक आहे.
National Student Laptop Scheme: व्हॉट्सअॅपवर फ्री लॅपटॉपचा मेसेज आलाय? PIB कडून करण्यात आलेला
गेल्या २०- २५ दिवसांपासून इथे मुले शांततापूर्ण आंदोलन करत होते. त्यावेळी काही नाही झालं. दिल्ली पोलिसांकडून काल पहिल्यांदा लाठीचार्ज करण्यात आला. त्यांची मारहाण पाहून कोणाचातरी जीव गेला पाहिजे. असे आदेशच त्यांना मिळाले होते. हेच दिसून येत होते. या मुलांना इतकं मारा इतकं मारा की या मुलांनी पुन्हा सरकारला प्रश्न विचारला नाही पाहिजे. असा आरोपही अभिजीतने केला. त्यांना मुलांचे आंदोलन थांबवायचेच होते. तर ते वॉटर कॅननचा वापर करू शकले असते, पण त्यांनी तसे केले नाही. त्यांनी मुलांना मरेपर्यंत मारहाणच केली.






