बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार

इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पहिल्यांदाच आपल्या नाराजीवर मौन सोडले आहे. माध्यमांशी बोलतानाही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्याला कोणत्याही गोष्टीचा राग नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून मला पंतप्रधानपदाची लालसा नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.

    पाटणा : इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पहिल्यांदाच आपल्या नाराजीवर मौन सोडले आहे. माध्यमांशी बोलतानाही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्याला कोणत्याही गोष्टीचा राग नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून मला पंतप्रधानपदाची लालसा नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.

    नुकत्याच झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी पत्रकार परिषदेला हजेरी लावली नव्हती. त्यामुळे पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत इंडिया आघाडीच्या निर्णयामुळे ते नाराज असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.

    नाराजी नाहीच; जेडीयू एकजूटच

    कोण काय बोलतं याकडे लक्ष देत नाही. कारण आजकाल लोक फायदा मिळवण्यासाठी काहीही बोलतात. याचा फायदा कोणालाच होणार नाही. ते म्हणाले की, जेडीयूतही कोणी नाराज नाही, पक्षात सर्वजण एकत्र आहेत.

    – नितीशकुमार, मुख्यमंत्री, बिहार.