गोहाटी : बरपेटा मतदारसंघाचे विद्यमान खासदार अब्दुल खालिक (Abdul Khaliq) यांनी पक्षाकडून पुन्हा एकदा उमेदवारी न मिळाल्याने पक्षाचा त्याग केला आहे. यानंतर त्यांनी काँग्रेस पक्ष मुस्लिमांची उपेक्षा करत असल्याचा आरोप लावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस पक्षाने 12 मार्च रोजी 12 उमेदवारांची नावे जारी केली होती. परंतु, अब्दुल खालिक यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यांच्याऐवजी आसाम प्रदेश सेवादलाचे अध्यक्ष दीप बयान यांना संधी देण्यात आली. विद्यमान सदस्य गौरव गोगोई जोरहाट, प्रद्योत बोरदोलोई हे नगांव येथून निवडणूक लढवणार आहे. असम जातीय परिषदेचे अध्यक्ष लुरिनज्योति गोगोई दिब्रुगड येथील उमेदवार आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्ष 14 पैकी 13 जागा लढवत असून, एक जागा सहकारी पक्ष आसाम जातीय परिषदेला (एजेपी) दिली आहे. दुसरीकडे आसाम राज्य विधानसभाचे उपाध्यक्ष नुमल मोमिन यांनी उमेदवारांची नावे पाहून काँग्रेसवर टीका केली आहे. यावर आपला पक्ष भाजपा अतिशय आनंदी आहे. कारण हा पक्ष राज्यात चांगल्याप्रकारे पराभूत होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.