नवी दिल्ली : देशाला स्वातंत्र्य होऊन आज ७५ वर्ष पूर्ण होत आहेत, (Independence Day) संपूर्ण देश आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi ka amrit mahostav) साजरा करत असताना, स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांची आठवण होणे स्वाभिवक आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात नेताजी सुभाष चंद्र बोस यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना नेताजी सुभाष चंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. नेताजींचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ रोजी झाला. तैवानमध्ये त्यांचं अपघाती निधन झालं होतं. त्यांचे अवशेष सप्टेंबर १९४५ पासून टोकियोच्या रेन्कोजी मंदिरात जनत करण्यात आले आहेत.
दरम्यान, आजच्या दिवशी अनेक स्वातंत्र्यसैनिकांची आठवण व त्यांच्या कार्याची माहिती सर्वांना आहे, याच धरतीवर सुभाषचंद्र बोस यांची मुलगी अनिता बोस फाफ (Daughter of Subhas Chandra Bose Anita Bose) यांनी भारत सरकारकडे महत्त्वाची विनंती केली आहे. नेताजींच्या अस्थी भारतात आणण्याची विनंती त्यांनी भारत सरकारकडे केली आहे. नेताजींच्या ७३ व्या पुण्यतिथीनिमित्त भारताने नेताजींच्या अस्थी भारतात आणाव्यात अशी मागणी त्यांच्या मुलीने केली आहे. तसेच भारताला अस्थी देण्याची मागणी त्यांनी जपान सरकारलाही केली आहे. त्यामुळं आगामी काळात नेताजींच्या अस्थी भारतात येण्याचा मार्ग मोकळा आहे. (Daughter of Subhas Chandra Bose appeals to PM Modi to bring his ‘mortal remains’ from Japan)