Delhi Bomb Blast Update: पोलिसांची अल-फलाह विद्यापीठावर छापेमारी; दिल्ली बॉम्ब स्फोटाशी काय आहे कनेक्शन
या धक्कादायक पार्श्वभूमीवर तपासकर्त्या दिल्ली गुन्हे शाखेने अल-फलाह विद्यापीठावर छापा टाकत 12 जणांना ताब्यात घेतले. विद्यापीठाचे नाव चर्चेत आल्यानंतर त्याचे मालक जवाद अहमद सिद्दीकी यांच्याबद्दलही विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी ३० ऑक्टोबर रोजी डॉ. मुझम्मिल अहमद गिनाई यांना अटक केल्यानंतर संपूर्ण मॉड्यूल उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली. हीच बाब लक्षात येताच उमरला धोका जाणवला आणि त्याने अल-फलाह विद्यापीठातून पलायन केले. तपासकर्त्यांच्या मते, गेल्या दोन वर्षांपासून उमर आणि मुझम्मिल देशात मोठ्या प्रमाणावर दहशतवादी हल्ल्याचा कट रचत होते.
तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, मुझम्मिलच्या अटकेनंतर उमर विद्यापीठातून गायब झाला. विद्यापीठातील एका इलेक्ट्रिशियनने त्याला हिदायत कॉलनीमध्ये भाड्याचे घर मिळवून दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्या घरमालकालाही ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे.
या मॉड्यूलच्या आर्थिक पुरवठ्यासाठी उमर आणि डॉ. मुझम्मिल हवाला नेटवर्कचा वापर करत होते. त्यामुळे या आर्थिक साखळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. दोन हवाला ऑपरेटर चौकशीच्या कक्षेत आहेत. फरिदाबाद, नूहसह अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून निधीच्या स्त्रोतांवर लक्ष केंद्रित केले जात आहे.
अल-फलाह विद्यापीठाचे मालक जावेद अहमद सिद्दीकी (वय ६१) हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी भूतकाळात तीन वर्षांचा तुरुंगवास भोगला असून चिट फंड ऑपरेशन चालवताना ते लोकांना पैसे परत करण्यात अयशस्वी ठरले होते. या प्रकरणात त्यांच्या विरोधात १४ ते १५ एफआयआर दाखल झाले होते. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, या चिट फंडमधून मिळालेला पैसा विद्यापीठ उभारण्यासाठी वापरल्याचा संशयही व्यक्त झाला होता. तथापि, नंतर त्यांनी गुंतवणूकदारांचे सर्व पैसे परत केल्यानंतर न्यायालयाने त्यांना सर्व प्रकरणांतून निर्दोष मुक्त केले.
प्रशांत किशोर करणार राजकारणाला राम राम? बिहारमधील दारुण पराभावर काय घेणार भूमिका
वद्यापीठ यापूर्वीही वादाच्या केंद्रस्थानी
जावेद सिद्दीकी हे अल-फलाह चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील अल-फलाह विद्यापीठावर यापूर्वीही वाद-प्रकरणांची छाया राहिली आहे. सध्या हे संस्थान १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोटातील दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित तपासाच्या केंद्रस्थानी आहे. या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला होता.
या कटाशी संबंधित तीन डॉक्टरांची नावे समोर आली आहेत—
उमर उन नबी, ज्याने बॉम्बस्फोट घडवून आणणारी कार चालवली,
मुझम्मिल अहमद गनई, ज्याला ३० ऑक्टोबर रोजी अटक झाली,
शाहीन शाहिद, जो अल-फलाहमध्ये अध्यापन करत होता आणि ज्याला ११ नोव्हेंबर रोजी लखनऊमध्ये अटक करण्यात आली.






