फोटो सौैजन्य: गुगल
भारत हा तरुणांचा देश म्हणूनही ओळखला जातो. बदलत्या जीवनशैलीचा भाग किंवा इतर अन्य कारणांमुळे देशातील तरुणांना कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे. भविष्यात कॅन्सच्या आजारामुळे तरुण पिढीवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो हे लक्षात घेत केंद्र सरकारद्वारे याबाबत ठोस पाऊल उचलण्यात येत आहे. देशात कॅन्सरचा वाढत चाललेला विळखा लक्षात घेत नागरिकांच्या आरोग्याबाबत आरोग्य विभाग सर्तक झालं आहे. वयवर्ष 30 आणि त्याहून जास्त असलेल्या नागरिकांची आता घरोघरी आरोग्य तपासणी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
देशात बहुतांश तरुणांना कमी वयातच मधुमेह, रक्तदाब आणि कर्करोगाने ग्रस्त आहेत. हीच बाब लक्षात घेत आरोग्य विभागाच्यावतीने घरोघरी या आजारांबाबत तपासणी सुरु होणार आहे, असं सांगण्यात आलं आहे. देशात कर्करोग, मधुमेह आणि इतर गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांची संख्या किती आहे. याबाबतची तपासणी करण्यासाठी आरोग्य केंद्रातील कर्मचारी आता नागरिकांनी आरोग्य तपासणी करण्यासाठी घरोघरी येणार आहे.
केंद्र सरकारच्या देशव्यापी अभियानाची सुरुवात फेब्रुवारीच्या 20 तारखेपासून ते संपूर्ण मार्च म्हणजेच महिनाभर असणार आहे. आयुष्यमान आरोग्य मंदिर (एएएम) आणि इतर आरोग्य केंद्रांवर याबाबत सखोल माहिती देण्यात येणार आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सर्व आरोग्य केंद्रांवर बीपी मॉनिटर्स, ग्लुकोमीटर आणि अत्यावश्यक औषधे यासारख्या अत्यावश्यक वैद्यकीय वस्तूंचा पुरवठा करुन देणं सुनिश्चित करावी लागेल. चाचणी, उपचार आणि पाठपुरावा यांचा डेटा दररोज NP-NCD पोर्टलवर अपलोड केला जाईल.
याशिवाय आरोग्य शिबिराची अंमलबजावणी योग्य रित्या व्हावी यासाठी जिल्हा आणि राज्य स्तरावर अधिकार नेमण्यात येणार आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश मंत्रालयाला दररोज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहवाल प्रदान करतील, सतत देखरेख आणि तांत्रिक समर्थनास अनुमती देतील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (ICMR-NIN) च्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण मृत्युदरामध्ये NCDs चा वाटा 66टक्के आहे.
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मधुमेह, तीव्र श्वसन रोग आणि कर्करोग यांसारखे आजार सध्या देशाच्या आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान आहे. विशेषत: 30 आणिल त्यापेक्षा जास्त वयाच्या रुग्णांकडे विशेष लक्ष देणं हे या शिबिराचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेमुळे वेळेत आजाराचे निदान करत उपचार करण्यावर शासनाचे लक्ष केंद्रित आहेत. या उपक्रमामुळे आरोग्य सेवा खर्च कमी होईल आणि देशभरातील व्यक्तींचे जीवनमान सुधारेल असा विश्वास आरोग्य मंत्रालयाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.