दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (फोटो- सोशल मिडिया)
Arvind Kejriwal: दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. दिल्लीमध्ये तिरंगी लढत होणार असून सर्व देशभरातून निवडणुकीच्या प्रचाराकडे लक्ष लागले आहे. दिल्लीच्या 70 जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. यासाठी येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान तर 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. दरम्यान आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निवडणुकीपूर्वी हल्ला झाला आहे. आम आदमी पक्षाने एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यावर आता माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अरविंद केजरीवाल यांच्यावर विधानसभा निवडणुकीपूर्वी हल्ला झाला आहे. त्यावर बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, “माझे जीवन देशासाठी समर्पित आहे. मात्र निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. “आम आदमी पक्षाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर हल्ल्याचा व्हिडिओ शेअर करून नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार परवेश वर्मा यांच्यावर आरोप केले आहेत.
पुढे बोलताना केजरीवाल म्हणाले, “निवडणुकीदरम्यान दिल्लीतील जनतेने असा प्रचार आणि हिंसाचार कधीही पाहिला नव्हता. ज्यामध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाजपचा हा प्रचार करण्याचा मार्ग आहे कारण त्यांना माहिती आहे ते हरत आहेत. मी नवी दिल्लीची जागा 20 हजार मतांनी हारणार असल्याचा हा वर्मा यांचा दावा हास्यास्पद आहे.”
नेमके प्रकरण काय?
आम आदमी पक्षाने त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवरून हल्ल्याचा व्हिडिओ पोस्ट केला आणि लिहिले की, ‘भाजप पराभवाला घाबरला, अरविंद केजरीवाल यांच्यावर त्यांच्या गुंडांनी हल्ला केला!’ भाजप उमेदवार प्रवेश वर्मा प्रचार करत असताना, भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांच्या गुंडांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर विटा आणि दगडांनी हल्ला केला आणि त्यांना प्रचार करू नये म्हणून त्यांना दुखापत करण्याचा प्रयत्न केला. भाजपवाल्यांनो, केजरीवालजी तुमच्या भ्याड हल्ल्याला घाबरणार नाहीत, दिल्लीचे लोक तुम्हाला योग्य उत्तर देतील.
सवाल पूछती जनता पर @ArvindKejriwal ने अपनी गाड़ी से 2 युवाओं को मारी टक्कर ।दोनों को लेडी हार्डिंग हॉस्पिटल ले कर गए हैं । हार सामने देखकर लोगों की जान की क़ीमत ही भूल गए ।
मैं हॉस्पिटल जा रहा हूँ । pic.twitter.com/IntWoqMCDP — Parvesh Sahib Singh (@p_sahibsingh) January 18, 2025
भाजपचे प्रत्युत्तर
दरम्यान, भाजपने प्रत्युत्तर देत आम आदमी पक्षावरवर हल्ला चढवला आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रवेश वर्मा म्हणाले की, केजरीवाल यांच्या काळ्या कारने आमच्या कार्यकर्त्यांना चिरडले. आमच्या एका कार्यकर्त्यांचा पाय तुटला आहे आणि मी त्यांना भेटण्यासाठी लेडी हार्डिंगकडे जात आहे. प्रवेश वर्मा म्हणाले की, गेल्या ११ वर्षांपासून दिल्लीत चालणाऱ्या सरकारने दिल्लीत भ्रष्टाचार पसरवलाच नाही तर दिल्लीलाही उद्ध्वस्त केले आहे. आज मी देशवासीयांना आणि दिल्लीतील जनतेला आवाहन करण्यासाठी आलो आहे की तुम्हाला दिल्ली वाचवावी लागेल, ११ वर्षांत यमुना केवळ घाण झाली नाही तर ती नाल्यासारखी झाली आहे.
हेही वाचा: Delhi Assembly Elections : अरविंद केजरीवाल यांचा उमेदवारी अर्ज होणार बाद? दिल्लीच्या राजकारणात आला नवीन ट्वीस्ट
केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याबाबत दिल्ली पोलिसांनी सांगितले की, त्यांच्यावर कोणताही हल्ला झाला नाही, लाल बहादूर सदनमध्ये अरविंद केजरीवाल यांची जाहीर सभा होती, भाजपचे काही लोक सभेला आले होते ज्यांना प्रश्न विचारायचे होते. यावेळी दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी करण्यात आली.






