मुंबई – जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं असेल, परंतु तुम्ही ड्रायव्हिंग टेस्ट पास व्हाल की नाही, अशी चिंता करत असाल तर अजिबात चिंता करू नका. अर्थात जास्त टेन्शन घेण्याची मुळीच गरज नाही बरं का? आता तुम्ही म्हणाल की, हे कसं शक्य आहे. मात्र, आज आम्ही तुम्हाला असंच काहीतरी सांगणार आहोत.
चला तर जाणून घेऊया की, ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी कोणतीही टेस्ट देण्याची कशी नाही. आणि अवघ्या ७ दिवसात ड्रायव्हिंग लायसन्स कशी मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
दर महिन्याला देशभरात लाखोच्या संख्येने लोक ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करतात. पण ड्रायव्हिंग टेस्टमध्ये नापास झाल्यामुळं अनेकांना परवाना मिळत नाही. ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमातही बदल करण्यात आलेला आहे. मोटार वाहन कायद्याच्या नियमांनुसार, १६ ते १८ वर्षे वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला वाहन चालविण्याचा परवाना मिळू शकतो. पण त्याला केवळ लर्निंग लायसन्स मिळेल. हा परवाना मिळाल्यानंतर ती व्यक्ती केवळ विना गिअरची गाडी चालवू शकतात. जर तुम्हाला विथ गिअर वाहन चालवायचे असेल तर तुम्हाला मात्र ड्रायव्हिंग लायसन्स काढावे लागेल.
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला https://sarathi.parivahan.gov.in/sarathiservice/stateSelection.do भेट द्यावी लागेल.