नवी दिल्ली : महागाई, बेरोजगारी विरोधात काँग्रेस देशभरात आंदोलन करत आहे. दिल्लीत मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलना पुर्वी काँग्रेस नेते यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर सडकून टिका केली. भारतातील प्रत्येक यंत्रणा आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) ताब्यात आहे. प्रत्येक संस्थेत संघाचा माणूस आहे. त्यामुळे आपण केवळ एखाद्या राजकीय पक्षाच्या विरोधात लढत नाही आहोत. तर भारताच्या संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरच्या विरोधात लढत आहोत, असं काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांनी म्हण्टलं आहे.
[read_also content=”https://www.navarashtra.com/maharashtra/protests-against-inflation-gst-unemployment-and-agnipath-congress-leaders-besieged-the-raj-bhavan-nrab-312248.html महागाई, जीएसटी, बेरोजगारी आणि ‘अग्निपथ’चा निषेध ; काँग्रेस नेत्यांचा राजभवनाला घेराव”]
नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी करत आहे. या कारवाईवरून काँग्रेसने सरकारवर घणाघात केला आहे. तसेच काँग्रेसने महागाई आणि बेरोजगारीबाबत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर आक्रमक भूमिका घेतली आहे. मी महागाईवर बोलतो. बेरोजगारीवर बोलतो. मी सत्य बोलतो. त्यामुळे माझ्या पाठी काही एजन्सी लावण्यात आल्या. पण मी खरं बोलायला घाबरत नाही. मी खरं बोलतो. त्यामुळेच लोक माझ्यावर टीका करतात. मी जेवढं सत्य बोलेल तेवढा माझ्यावर हल्ला होईल. पण मी त्याला नाही घाबरत. माझ्यावर जेवढा हल्ला होईल. तेवढं मी शिकत असतो. मला चांगलं वाटतं, असंही राहुल गांधी म्हणाले.
[read_also content=”‘तारीख पे तारीख’! सद्यस्थितीत सर्वोच्च न्यायालयात ७१ हजार खटले प्रलंबित महागाईhttps://www.navarashtra.com/india/supreme-court-fir-pending-many-more-seventy-one-thousand-fir-pending-kiren-rijuji-information-312298.htmlजीएसटी, बेरोजगारी आणि ‘अग्निपथ’चा निषेध ; काँग्रेस नेत्यांचा राजभवनाला घेराव”]
सरकार महागाई आणि बेरोजगारीला घाबरत आहे. हे लोक जनतेच्या ताकतीला घाबरत आहेत. कारण सत्तेतील लोक खोटं बोलत आहेत. देशात बेरोजगारी, महागाई नाही, देशात चीनची घुसखोरी झालेली नाही, असं हे लोक खोटं सांगत आहेत. हे लोक खोटं बोलतात. केवळ खोटे बोलतात, असा आरोपही त्यांनी केला.