येत्या सोमवारपासून सुरु होतंय संसदेचे हिवाळी अधिवेशन; राज्यसभा खासदारांसाठी गाईडलाईन्स जारी, त्यात म्हटलंय…

संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्याआधी राज्यसभा खासदारांसाठी विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत. राज्यसभेत उपस्थित होणाऱ्या विषयांची कोणतीही प्रसिद्धी करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सूचनांमध्ये सर्व राज्यसभा - खासदारांना स्पष्टपणे सांगण्यात आले

    नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्याआधी राज्यसभा खासदारांसाठी विशेष सूचना (Guidelines for MP) जारी करण्यात आल्या आहेत. राज्यसभेत उपस्थित होणाऱ्या विषयांची कोणतीही प्रसिद्धी करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

    सूचनांमध्ये सर्व राज्यसभा – खासदारांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, जोपर्यंत सभापती नोटीस मंजूर करत नाहीत आणि इतर खासदारांना कळवत नाहीत, तोपर्यंत या नोटिसा सार्वजनिक करू नयेत. एप्रिल २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या राज्यसभा सदस्यांसाठी हँडबुकमध्ये नमूद केलेल्या संसदीय परंपरा आणि कार्यपद्धतींचे स्मरणपत्रही देण्यात आले आहे.

    या सूचनांमध्ये संसदीय परंपरा आणि कार्यपद्धतींचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. खासदारांनी अनावश्यक आणि वादग्रस्त विषय टाळावेत, असे निर्देशांमध्ये म्हटले आहे.