arvind kejriwal

आपचे नेते अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि संजय सिंह (Sanjay Singh) यांना गुजरात उच्च न्यायालयाने (Gujrat High Court) जोरदार झटका दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पदवीच्या बदनामी प्रकरणी दोन्ही आप नेत्यांना बजावलेल्या समन्सला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला.

    अहमदाबाद : आपचे नेते अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि संजय सिंह (Sanjay Singh) यांना गुजरात उच्च न्यायालयाने (Gujarat High Court) जोरदार झटका दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पदवीच्या बदनामी प्रकरणी दोन्ही आप नेत्यांना बजावलेल्या समन्सला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला.

    पंतप्रधान मोदी यांच्या पदवीबाबत गुजरात विद्यापीठाने दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या प्रकरणात न्यायदंडाधिकारी इ न्यायालयाने आप नेते अरविंद केजरीवाल आणि संजय सिंह यांना समन्स बजावले होते. ट्रायल कोर्टाने यापूर्वी बजावलेले समन्स रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर हायकोर्टात सुनावणी झाली.

    दरम्यान, न्यायमूर्ती जे.सी. दोशी यांनी गुजरात विद्यापीठ आणि राज्य सरकारला नोटीस बजावून त्यांचे उत्तर मागवले आहे. तसेच या प्रकरणाच्या सुनावणीसाठी तीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली असून, नोव्हेंबरची तारीख दिली आहे. अहमदाबादच्या मॅजिस्ट्रेट कोर्टाने एप्रिलमध्ये आम आदमी पक्षाच्या नेत्यांना समन्स बजावले होते. त्यावर 14 ऑक्टोबरला मॅजिस्ट्रेट कोर्टात सुनावणी होणार आहे.

    दिलासा देण्यास कोर्टाचा नकार

    गुरुवारी हायकोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील रेबेका जॉन यांनी आप नेत्यांच्या वतीने हजर राहून न्यायमूर्ती दोशी यांना त्या सुनावणीपूर्वी किमान अंतरिम दिलासा देण्याची विनंती केली. त्यावर न्यायमूर्ती दोशी यांनी या टप्प्यावर कोणताही दिलासा सविस्तर देण्यास नकार दिला.