रांची : अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने केलेल्या अटकेविरोधात झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी ईडीच्या अटकेला आव्हान दिले आहे. त्यांच्या वतीने हजर होऊन ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी न्यायालयाला विनंती केली की, ‘तुम्हाला मनी लाँड्रिंगच्या कलम 19 मधील तरतुदींवर प्रकाश टाकावा लागेल. एखाद्याला अशाप्रकारे अटक कशी केली जाऊ शकते. यावर लवकरच निर्णय घ्यावा’, अशी विनंती त्यांनी खंडपीठाकडे केली.
कपिल सिब्बल यांनी सांगितले की, हेमंत सोरेन यांनी उच्च न्यायालयातून अर्ज मागे घेतला आहे. यादरम्यान कपिल सिब्बल यांनी हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या मेमोमध्ये ही वेळ 10 वाजताची आहे, तर प्रत्यक्षात अटक संध्याकाळी 5 वाजता झाली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. तुम्ही याकडे लक्ष देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी सिब्बल यांनी केली.
अटकेचा राजकीय संबंध
अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राडू म्हणाले की, ‘हेमंत सोरेन यांच्यावरील आरोप अतिशय गंभीर आहेत. सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी अटकेचा संबंध राजकीय कारणाशीही जोडला.