संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

    नवी दिल्ली : कर्नाटक भाजपनं काँग्रेसविरोधात केलेली आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवण्याचे आदेश निवडणूक आयोगानं ट्विटरला दिले आहेत. याप्रकरणी आयोगानं अधिकृत पत्रही पाठवले आहे. तसेच, या प्रकरणात एफआयआरही दाखल करण्यात आला आहे.
    कर्नाटक भाजपने ४ मे रोजी एक अॅनिमेटेड व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर आरक्षणाच्या मुद्द्यावरून निशाणा बनवण्यात आले होते. या १७ सेकंदाच्या क्लीपमध्ये कन्नड भाषेत सावध राहा, सावध राहा, सावध राहा, असा इशारा देण्यात आला होता.
    या व्हिडिओवर काँग्रेसनं आक्षेप घेत ५ मे रोजी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. यामध्ये काँग्रेसने आरोप केला होता की, भाजपने याद्वारे दंगलीला आणि शत्रुत्वाला चिथावणी दिली आहे. काँग्रेसच्या या तक्रारीनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपला निर्देश दिले आहेत की, त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ती पोस्ट हटवावी. पण, आदेश देऊनही भाजपने तो व्हिडिओ हटवलेला नाही.