संग्रहित फोटो
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचा मृतदेह आपटे रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये शनिवारी दुपारी आढळून आला आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली असून, प्राथमिक तपासात विष प्राशन करून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे. संबंधित उद्योजक बेपत्ता असल्याची तक्रार शुक्रवारी स्वारगेट पोलिसांत दाखल करण्यात आली होती. अशोक मिलापचंद जैन (वय ६१, रा. लोढा पार्क, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी) असे मृतावस्थेत आढळलेल्या उद्योजकाचे नाव आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अशोक जैन हे शुक्रवारी घरातून बाहेर पडले होते. नंतर त्यांनी कुटुंबीयांशी संपर्क साधला नव्हता. मोबाईलवर संपर्क होत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी सायंकाळी स्वारगेट पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, शनिवारी दुपारी आपटे रस्त्यावरील हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी डेक्कन पोलिसांना फोन करून एक ग्राहक खोलीचा दरवाजा उघडत नसल्याची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दार उघडले असता अशोक जैन मृतावस्थेत आढळून आले. खोलीत विविध ठिकाणी उलटी झाल्याचे निदर्शनास आले.
जैन यांनी विष प्राशन केल्याचा संशय असून प्रथमदर्शनी आत्महत्येचा प्रकार असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांना खोलीत एक चिठ्ठीही आढळून आली असून, ती जैन यांनी लिहिल्याचा संशय आहे. त्यामध्ये आर्थिक अडचणींचा उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, चिठ्ठीची सविस्तर पडताळणी नातेवाईकांच्या मदतीने करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
हॉटेलच्या खोलीत प्रेमीयुगुलाचे आढळले मृतदेह
झाशी जिल्ह्यात झालेल्या घटनेने सगळ्यांना धक्का बसला आहे. दोन कपल यांनी एक हॉटेल बुक केल होत. मात्र आतून दोघे बाहेर का येत नाहीत. हे पाहायला गेल्यावर दोघांचे ही मृतदेह आढळून आले आहेत. झाशीच्या होटल रॉयल इन यामध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. खोली नंबर २०५ मध्ये हे दोघे जण राहत होते. मृत तरुणाचे नाव हे युवराज यादव (२३) तर मृत महिलेच नाव हे भारती (वय ३४) वर्ष अशी या दोघांची नाव आहेत. होटल रॉयल इनमध्ये दोघांचा मृतदेह आढळून आल्यावर पोलीस तातडीने तिथे पोहोचले. पोलिसांनी आधी प्राथमिक माहिती गोळा केली आणि त्यानंतर या दोघांचा मृतदेह हा पोस्टमार्टेमसाठी त्यांनी पाठवून दिला. त्या दोघांनी विषप्राशन केली असावी असा त्यांचा प्राथमिक अंदाज आहे.






